केवळ कारवाई न करता त्यांचे अहवाल वेळेत देऊन प्रकरणे निकाली काढण्यावरही भर दिला जात आहे. अन्नपदार्थांची मानके निश्चित करणे, अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करणे आणि भेसळ रोखणे ही एफडीएची महत्त्वाची जबाबदारी आहे. मात्र, अपुरी यंत्रणा आणि प्रयोगशाळेतील विलंबामुळे प्रभावी कामकाजात अडचणी येत होत्या. आता हे चित्र बदलत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नागपूर विभागात या काळात सर्वाधिक ७१६ तपासण्या नागपूर जिल्ह्यात झाल्या. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहआयुक्त कृष्णा जयपूरकर यांच्या नेतृत्वात पुढेही कारवाया सुरू राहतील, असे सहायक आयुक्त रोहन शहा यांनी सांगितले.
Nagpur News : 2019 मध्ये मुलगा गेला, पित्याला सूनेवर जादूटोण्याचा संशय, वादाने टोक गाठलं, नागपुरात मन सुन्न करणारी घटनासाडेबावीस लाखांचा दंड वसूल
ज्या आस्थापनांना बंदची नोटीस देण्यात आली, ती त्रुटी दूर करून स्थानिक कार्यालयांना पूर्तता अहवाल दिल्यानंतर पुन्हा सुरू होऊ शकतात. २२६ प्रकरणांत एफडीएने तडजोड शुल्क आकारून छोट्या नोंदणीधारकांना स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याची समज दिली. गेल्या पाच महिन्यांत २२ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ६० परवानाधारकांची प्रकरणे न्यायनिर्णयासाठी दाखल करण्यात आली असून ती सहआयुक्त कृष्णा जयपूरकर यांच्यासमोर सुनावणीसाठी आहेत. तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या १,१२५ अन्ननमुन्यांपैकी ४६ कमी दर्जाचे, ४२ लेबल दोष असलेले आणि ३२ असुरक्षित आढळले.
OYO सह विविध हॉटेल्सवर 90 दिवसांचं चित्रिकरण ठेवावं लागणार, एण्ट्रीसाठी पोलिसांकडून कडक निर्बंध; बावनकुळेंनी दिली माहितीप्रयोगशाळेत शिफ्टनुसार काम
एफडीएच्या प्रयोगशाळेत सहायक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ, वरिष्ठ तांत्रिक सहायक अशी अनेक पदे रिक्त होती. आता यातील बहुतांश पदे भरण्यात आली आहेत. पूर्वी प्रयोगशाळेला शनिवार-रविवारी सुट्टी असायची; आता शिफ्टनुसार काम सुरू झाल्याने आठवड्याचे सातही दिवस नमुन्यांची तपासणी केली जात आहे, असे एफडीएतर्फे सांगण्यात आले.
जिल्हानिहाय तपासण्या
नागपूर : ७१६
भंडारा : २०३
चंद्रपूर : १४५
वर्धा : १६८
गडचिरोली : १०६
गोंदिया : ११४