• Fri. Sep 18th, 2026

Sharad Pawar: रोहित पवारांनी भाषणात किस्सा सांगताना अधिकाऱ्याचं नाव अर्धवट घेतलं, आजोबांनी तात्काळ दुरुस्त केलं; शरद पवारांच्या स्मरणशक्तीचा पुन्हा प्रत्यय

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘देशाच्या लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येला उपलब्ध जमीन पुरेनाशी झाली आहे. त्यामुळे शेतीवरील अतिरिक्त लोकसंख्येला अन्य क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्यातील उद्योगांचे विकेंद्रीकरण करून विविध भागांत औद्योगिक क्षेत्रे विकसित करण्याची गरज आहे,’ असे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.

मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनच्या ‘आंतरराष्ट्रीय एक्स्पो २०२७’च्या माहितीपत्रकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते पवार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘ब्लू ओशन कॉर्पोरेशन’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सत्या मेनन, असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, आमदार रोहित पवार या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘स्वातंत्र्याच्या वेळी देशाची लोकसंख्या सुमारे ३५ कोटी होती आणि त्यातील सुमारे ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून होते. आता लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून, शेतीची जमीन मात्र त्या प्रमाणात वाढलेली नाही. मुंबई आणि पुण्याच्या आसपासच्या भागात शेतीच्या जमिनींचे निवासी वापरात रूपांतर होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात शेतीवरील अवलंबित्व कमी करून उद्योग, सेवा आणि अन्य क्षेत्रांत रोजगार निर्माण करणे हा महत्त्वाचा पर्याय आहे. महाराष्ट्राची उद्योजकतेची परंपरा लक्षात घेता उद्योग केवळ काही मोजक्या शहरांमध्ये केंद्रित न ठेवता राज्याच्या विविध भागांत पोहोचविणे आवश्यक आहे. उद्योगांचे विकेंद्रीकरण झाल्यास स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होईल आणि स्थलांतराचा दबावही कमी होण्यास मदत होईल. लातूर, धाराशिव, नांदेड, नागपूर यांसह विविध भागांत उद्योग पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

स्मरणशक्तीचा प्रत्यय

ह्युंदाई कंपनी भारतात गुंतवणुकीसाठी येणार होती. तेव्हा पवारसाहेबांना कंपनीच्या अधिकाऱ्यांचा फोन आला. या अधिकाऱ्याचे नाव आमदार रोहित पवार यांनी भाषणात अर्धवट घेतले. त्यावर पवारांनी जागेवरून लगेचच त्या अधिकाऱ्याचे नाव ‘चार्ल्स हे हॉग’ असे होते, असे सांगितले आणि पवारांच्या अफाट स्मरणशक्तीचा प्रत्यय उपस्थितांनी घेतला.

‘व्यवसायात मोठे यश मिळवायचे असेल, तर उत्पादन आणि विक्रीसोबतच पुरवठा साखळी व्यवस्थापनाचे सखोल ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. भारत पुरवठा साखळी व्यवस्थापनाच्या बाबतीत जगाच्या तुलनेत सुमारे २५ वर्षे मागे आहे. त्यामुळे उद्योजकांनी पुरवठा साखळी व्यवस्थापन समजून घेऊन त्यातील बारकावे आत्मसात करण्याची गरज आहे,’ असे डॉ. मेनन यांनी सांगितले. स्वप्नील चौधरी यांनी सूत्रसंचालन, सचिव सई बहिरट यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला, तर कोषाध्यक्ष राजेश कुऱ्हाडे यांनी पहिल्या प्रदर्शनाबाबत माहिती दिली. तुषार जाधव यांनी ‘कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर’ यावर मार्गदर्शन केले.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed