• Wed. Sep 16th, 2026

Crime News: लग्नानंतर अवघ्या ४ महिन्यांत संसाराची राखरांगोळी; कामावरून घरी परतताच पतीला धक्का, १८ वर्षीय पत्नीची बॉडी आढळली!

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर: वाळूज एमआयडीसी हद्दीतील बजाजनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या एका १८ वर्षीय नवविवाहितेने पती कामावर गेला असताना राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रविवारी (१३ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पंढरपूर येथील हनुमान मंदिराजवळ ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या दुर्दैवी घटनेत प्रांशू शिवप्रकाश पाल (वय १८, मूळ रा. मध्य प्रदेश, सध्या रा. हनुमान मंदिराजवळ, बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर) या नवविवाहितेचा मृत्यू झाला आहे. मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या प्रांशूचा विवाह चार महिन्यांपूर्वीच वाळूज परिसरातील एका खासगी कंपनीत कामाला असलेल्या शिवप्रकाश पाल याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर दोघे पती-पत्नी बजाजनगर भागात भाड्याच्या खोलीत राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे चहापाणी झाल्यानंतर शिवप्रकाश हा सकाळी आठ वाजेच्या सुमारास कंपनीत कामासाठी निघून गेला होता. दिवसभर प्रांशू घरी एकटीच होती. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिवप्रकाश कामावरून परतला असता त्याने घराचा दरवाजा वाजवला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने त्याने खिडकीतून आत डोकावून पाहिले असता प्रांशूला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. नातेवाईकांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

​आत्महत्येचे कारण अस्पष्ट; वाळूज एमआयडीसी पोलिसांत नोंद

लग्नाला अवघे चार महिने झाले असताना १८ वर्षीय प्रांशूने हे टोकाचे पाऊल का उचलले, तिला काही मानसिक अथवा कौटुंबिक त्रास होता का, याबाबतचे कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed