KDMC Hospital: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या गौरीपाडा येथील आरक्षित भूखंडावर उभारण्यात आलेली रुग्णालयाची इमारत अद्याप सुरू झालेली नसल्याने नागरिक तक्रार करत आहेत.
यंत्रणा अपुरी नागरिकांची तक्रार
महापालिकेचे एक रुग्णालय बाह्य यंत्रणेमार्फत चालविण्यास देऊन तेथील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या मदतीने गौरीपाडा रुग्णालय सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. मात्र हा प्रस्तावही अद्याप लालफितीत अडकला आहे. महापालिकेच्य डोंबिवलीतील शास्त्रीनगर आणि कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयासह चार ते पाच रुग्णालये, आपला दवाखाना आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत. मात्र ही यंत्रणा अपुरी पडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
तीन मजली इमारत
केडीएमसी क्षेत्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने गौरीपाडा येथील १६ हजार चौरस फूट जागेत तीन मजली इमारत उभारण्यात आली.
सुविधा असलेले रुग्णालय
या इमारतीत १०० खाटांचे सर्जिकल आणि मेडिकल आयसीयू, किडनी स्टोनसाठी सुविधा, हृदयविकारांवरील उपचारांसाठी कॅथलॅब अशा सुविधा असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता.
अपेक्षा अपूर्णच
यासाठी पालिका प्रशासनाकडून अंबरनाथ वैद्यकीय महाविद्यालयाबरोबर करार करण्यात आला होता. मात्र या डॉक्टरांबाबतही तक्रारी वाढत असून, मोठ्या प्रमाणावर डॉक्टर नेमूनही रुग्णालयात रुग्णांना दैनंदिन उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. याच महाविद्यालयीन डॉक्टरांच्या मदतीने गौरीपाडा रुग्णालयात टर्शरी केअर सेवा सुरू करण्याची अपेक्षाही पूर्ण झालेली नाही.
Ghodbunder Road: घोडबंदर रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला ;रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांची कामे अपूर्णावस्थेत
प्रशासनाकडे उत्तर नाही
या पार्श्वभूमीवर पालिकेने वसंत व्हॅली येथील प्रसूतीगृह बाह्य यंत्रणेद्वारे चालवून, तेथील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या मदतीने गौरीपाडा रुग्णालय सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र प्रसूतीगृह चालविण्यासाठीही बाह्य यंत्रणा पुढे येत नसल्याने गौरीपाडा रुग्णालयावरील धूळकधी झटकली जाणार, या प्रश्नाचे उत्तर सध्या प्रशासनाकडे नाही.
