• Fri. Sep 11th, 2026

Manoj Jarange Patil On Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी जरांगे यांना भाऊ संबोधून भोजनाचे निमंत्रण दिले, यावर ते बोलत होते.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, जालना : मनोज जरांगे माझे भाऊ आहेत, त्यांना घरी जेवायला बोलवणार,’ असे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी जरांगे यांना आमंत्रण दिले. नागपुरातील एका कार्यक्रमात अमृता फडणवीसांनी केलेल्या या वक्तव्याची चर्चा राज्यभर रंगली. अखेर, मनोज जरांगेंकडूनही आता यावर उत्तर देण्यात आलंय. ‘भाऊबीजेला साडी-चोळी घेऊन येतो,’ असे सांगून जरांगे यांनी अमृता फडणवीसांचं आमंत्रण स्वीकारले आहे.

‘भाऊबीजेला साडी चोळी घेऊन जेवायला जाऊ; पण आत्ता नाही. भाऊ मैदानात आंदोलनात असताना बहिणीने जेवायला बोलावू नये. बहिणीने तेवढा बारकाईने विचार करावा,’ असे मनोज जरांगे म्हणाले.

Liquor Ban in Jalna | अंतरवालीत मनोज जरांगेंचं आंदोलन संपेपर्यंत दारूबंदी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

कुणबी प्रमाणपत्र वाटपाची शिबिरे केवळ आंदोलनापुरती राबवली जात आहेत, की त्यामागे आणखी काही उद्देश आहे, याचा विचार करावा लागेल. मिळालेली जात प्रमाणपत्रे रद्द करण्यासाठी तर काहींच्या सल्ल्याने हे शिबिर आयोजित केले नाही ना, याकडेही लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या तीन वर्षांत आपण कोणत्याही शिष्टमंडळाची वाट पाहिली नाही, आपण आपल्या जीवावर आंदोलन करतो. मुंबईला आम्ही जाणारच, असे त्यांनी सांगितले.

भाषेवरून सुरू असलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी तीन वर्षे चांगल्या भाषेत संवाद साधल्याचे सांगितले. मात्र, ते जातीच्या नव्हे, तर पक्षाच्या बाजूने बोलत आहेत. काही व्यक्तींमुळे आपले आणि शिंदे यांचे संबंध खराब झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा सामान्य रुग्णालय आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अधिपत्याखालील वैद्यकीय पथके अंतरवाली सराटीत २४ तास कार्यरत आहेत. आठ सप्टेंबर रोजी जरांगे यांना सात सलाइन लावली होती. नऊ सप्टेंबर रोजी दुपारी एक सलाइन लावले. त्यानंतर रात्री ११.३० वाजता तीन सलाइनद्वारे आयव्हीफ्ल्यूड देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

Maharashtra TimesNagpur Marbat Festival: कॉक्रोच, मुनीर, महागाईला घेऊन जा रे बडग्या…; नागपुरात आज ऐतिहासिक मारबत-बडग्या महोत्सवमुंबईला जाणारच
मुंबईला नक्की जाणार; पण कधी निघणार, ती तारीख उद्या, शनिवारी (१२ तारखेला) जाहीर करू. सगळ्यांच्या इच्छेवर उपोषण आहे. सरकार जाणूनबुजून गुन्हे दाखल करणार आहे. त्याला आम्ही भिणार नाही. जसे दिवस येतात, तसा संघर्ष करावा लागतो. अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा