• Fri. Sep 11th, 2026

Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले?

“मी मुख्यमंत्री असताना नेहमीच सांगायचो की, मी मुख्यमंत्री नाही तर सर्वसामान्य माणूस आहे. आज मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. मी महाराष्ट्राचा DCM म्हणजेच डेडिकेटेड कॉमन मॅन आहे”, असं एकनाथ शिंदे भाषणात म्हणाले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लंडन : ब्रिटनच्या संसदेतील वरिष्ठ सभागृह असलेल्या ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी इंग्रजीत भाषण केलं. एकनाथ शिंदे यांनी जवळपास अर्धा तास इंग्रजीमध्ये भाषण केलं. यावेळी त्यांनी भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापासून ते दिवंगत ज्येष्ठ कवी सुरेश भट, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख केला. त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पनेचा मुद्दा मांडला. भारत-ब्रिटन संबंधांबाबत भाष्य केलं. तसेच त्यांनी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात केलेल्या कामांची माहिती दिली. आपल्या भाषणात त्यांनी लाडकी बहीण योजना आणि शासन आपल्या दारी योजनांचा देखील उल्लेख केला.

‘हा महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा सन्मान’

“नमस्कार! जय हिंद! जय महाराष्ट्र! छत्रपती शिवाजी महाराज की जय! भारत माता की जय! या ऐतिहासिक सभागृहात पुरस्कार स्वीकारण्याचा सन्मान मिळत आहे. हे सभागृह लोकशाही, अनेक महत्त्वाच्या चर्चासत्रांच्या गेल्या अनेक दशकांचे साक्षीदार आहे. मी विनम्रपणे हा पुरस्कार स्वीकारत आहे. हा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा सन्मान आहे”, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

Maharashtra TimesMumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैद

शिंदेंकडून सुरेश भट यांच्या कवितेचा उल्लेख

“महाराष्ट्राची जनता आणि महाराष्ट्राचे शासन यांच्यावतीने मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो. मी माझ्या महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्यावतीने आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने कृतज्ञता व्यक्त करतो. आमच्या मराठीचे ज्येष्ठ कवी सुरेश भट यांनी आपल्या एका कवितेत मराठीची महती सांगितली आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. आम्हाला आमच्या मराठी भाषेचा अभिमान आहे. आम्ही मराठी भाषा बोलतो याचा मला अभिमान आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदेंकडून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक

“भारत आणि ब्रिटन यांच्यात केवळ इतिहासाचे नाते नाही, तर लोकशाही, स्वातंत्र्य आणि मानवतावादी मूल्ये यांचीही समान बांधिलकी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात दोन्ही देशांच्या नात्याने एका सुवर्णकाळात प्रवेश केला आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी यावेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेबाबत भाष्य केलं. तसेच मोदी यांच्या नेतृत्वाताला जगानेदेखील मान्यता दिली असून विविध देशांनी त्यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देवून सन्मानित केल्याचं शिंदेंनी सांगितलं.

Maharashtra TimesPalghar Case : ‘तुमच्या हलगर्जीपणामुळेच नऊ आरोपी फरार’, मुंबई हायकोर्टाचे पालघर पोलिसांवर ताशेरे

शिंदेंचं लाडकी बहीण योजनेबद्दल भाष्य

एकनाथ शिंदे यांनी यावेळी त्यांनी मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची माहिती आपल्या भाषणात दिली. त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा यावेळी उल्लेख केला. “मी भाग्यवान आहे की मला एक सख्खी बहीण आहे. पण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मला अडीच कोटी बहिणींचे आशीर्वाद मिळाले. कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यांमधून आर्थिक मदत मिळाली”, अशी माहिती त्यानी आपल्या भाषणात दिली.

“ही चॅरिटी नाही तर महिलांच्या स्वाभिमान आणि आर्थिक स्वातंत्र्यांसाठी ही मदत करण्यात आली. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या तर त्यांचं संपूर्ण कुटुंबदेखील आर्थिकदृष्ट्या सक्षम होतं. यामुळे कुटुंबातील मुलांच्या शिक्षणालादेखील मदत झाली. महिला सबलीकरणासाठी ही योजना महत्त्वाची ठरली. या योजनेची दखल जागतिक स्तरावरील संस्थांनी घेतली”, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.

Maharashtra TimesNashik News : दोन दिवसांपूर्वी नाशिक पालिका आयुक्तांचं खड्ड्यांवरुन चॅलेंज अन् दुसरीकडे इंदिरानगरमध्ये मुख्य रस्त्याला मोठं भगदाडएकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी योजनेचादेखील उल्लेख केला. केवळ रस्ते बांधणे म्हणजे विकास नसून तर विकास लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते, असे एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले.