MLA Ravindra Chavan Ratnagiri Visit : भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या दौऱ्याने रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये भाजपला नवी ऊर्जा मिळाली आहे. संघटनात्मक वाढीसाठी जोमाने काम करण्याचं रविंद्र चव्हाण यांनी आवाहन केलं आहे.
संघटनेची मजबूत बांधणी करण्याचा संदेश
या दौऱ्यात सावंतवाडी येथे भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक, तसेच रत्नागिरी येथे दक्षिण आणि उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेत कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरून गावागावात देशभक्त कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे आवाहन केले. तन, मन, धन अर्पण करून पक्षकार्यात योगदान देत प्रत्येक स्तरावर, विशेषतः बूथ पातळीवर संघटनेची मजबूत बांधणी करण्याचा संदेश त्यांनी दिला.
एकीकडे जिल्ह्यात दुष्काळ, शेतकरी पिकांच्या चिंतेत, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचा प्रताप; दहीहंडीनिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे पोस्टर शासकीय कार्यालयांवर
पक्षाचा जनाधार आणखी विस्तारण्याचे उद्दिष्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासकामे आणि विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यावरही त्यांनी विशेष भर दिला. यासोबतच जनतेशी सातत्याने संवाद साधत सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचण्याचे निर्देशही दिले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार असून, विविध नगरपरिषदांमध्ये मोठ्या संख्येने भाजपाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवक कार्यरत आहेत. या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकासकामांना संघटनात्मक संपर्काची जोड देत पक्षाचा जनाधार आणखी विस्तारण्याचे उद्दिष्ट या बैठकांमध्ये अधोरेखित करण्यात आले.
कार्यकर्त्यांचे ऊर्जाकेंद्र म्हणून विकसित व्हावीत
तसेच S.I.R., सेवा संकल्प अभियान, पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग यांसह विविध संघटनात्मक विषयांवरही यावेळी चर्चा झाली. कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, वैचारिक बांधणी आणि आगामी उपक्रमांच्या नियोजनाला यामुळे दिशा मिळाली. कणकवली आणि रत्नागिरी येथे ‘भाजपा भवन’ जिल्हा कार्यालयांच्या उभारणी कामाचीही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पाहणी केली. केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना केलेल्या आवाहनानुसार उभारली जाणारी ही कार्यालये केवळ पक्षाचे प्रशासकीय केंद्र न राहता राष्ट्रसेवेची कार्यशाळा, जनआकांक्षांचे व्यासपीठ आणि कार्यकर्त्यांचे ऊर्जाकेंद्र म्हणून विकसित व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भविष्यात चरित्र निर्माणातून राष्ट्र निर्माणाच्या उद्दिष्टालाही या केंद्रांमधून चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
Mumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैद
कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
दौऱ्यात भाजपचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या जनसंपर्क कार्यालयांना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी रत्नागिरी परिसरातील पक्षाच्या कामकाजाची माहिती घेतली. उत्तर रत्नागिरीमध्ये विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशातून उत्तर रत्नागिरी परिसरात भाजपचे पक्ष संघटन मजबूत होत असल्याचे अधोरेखित झाले.
शत-प्रतिशत भाजपाच्या ध्येयाकडे वाटचाल
या दौऱ्यात मंत्री नितेश राणे, प्रदेश सरचिटणीस आमदार योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे, माजी आमदार विनय नातू, भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, भाजपा रत्नागिरी शहराध्यक्ष परशुराम ढेकणे, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या या दौऱ्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील पक्षाच्या आगामी वाटचालीला स्पष्ट दिशा मिळाली असून, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि स्थानिक नेतृत्वाची ताकद यांची सांगड घालत शत-प्रतिशत भाजपाच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे.
