मंत्री अतुल सावे यांच्या भाऊ आणि पुतण्यावर स्थानिक गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंत्र्यांच्याच कुटुंबियांवर हल्ला करण्याची हिंमत कशी होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणी अतुल सावे यांनी कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांच्या भाऊ आणि पुतण्यावर स्थानिक गुंडांनी प्राणघातक हल्ला केल्याची अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. पैठण तालुक्यातील खांदेवाडी येथील काँक्रीट प्लांटजवळ हा प्रकार घडला असून, लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत मंत्री सावे यांचा पुतण्या गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. या घटनेनंतर मंत्री अतुल सावे यांनी तीव्र संताप व्यक्त करत स्थानिक गुंडांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मंत्री अतुल सावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पुतण्याचा खांदेवाडी येथे गेल्या दोन वर्षांपासून काँक्रीट प्लांट सुरळीत सुरू आहे. आज अचानक काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी तिथे गाड्या आणून रस्ता रोखला आणि हुज्जत घालण्यास सुरुवात केली. मंत्री सावे यांच्या भावाने “रस्त्याचा काही विषय असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ किंवा मोजणी करून घेऊ,” अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही न ऐकता गुंडांनी भावाला धक्काबुक्की सुरू केली. पुतण्या मध्यस्थी करण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यात बुलेटच्या लोखंडी रॉडने आणि कड्याने गंभीर वार करण्यात आले.
Mumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैद
पुतण्याची प्रकृती चिंताजनक; ‘आयसीयू’त उपचार सुरू
हल्ल्यात पुतण्याच्या डोक्याला गंभीर दुखापात झाली असून मोठी खोच पडली आहे. सुरुवातीला सरकारी रुग्णालयात नेऊन टाके घातल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी ‘सिग्मा’ रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. तो सध्या डॉक्टरांच्या कडक निगराणीखाली असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे मंत्री सावे यांनी सांगितले. या हल्ल्यादरम्यान भावाच्या खिशातील पैसेही काढून घेण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Eknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले?
“स्थानिक गुंड प्रवृत्तीचे लोक एमआयडीसी आणि इंडस्ट्रियल भागात दादागिरी करून हप्ता वसुली करण्याचा प्रयत्न करतात. त्याच हेतूने त्यांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला आहे. घटनेचे सर्व फोटो आणि व्हिडिओ पोलिसांना दिले असून त्यात सर्व आरोपी स्पष्ट दिसत आहेत,” अशी माहिती अतुल सावे यांनी दिली. त्यांनी पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांशी थेट संपर्क साधून या गुंडांचा तत्काळ बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा