• Thu. Sep 10th, 2026

Pune Marathi News : 10 वर्षांपूर्वी केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा नारळ घाईघाईत फोडला गेला. प्रत्यक्ष जागा ताब्यात नसताना कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली खरी; पण रस्ता अजूनही सलग झालेला नाही.

पुणे कात्रज कोंढवा रस्ता अपघात(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावर रोज सामान्य पुणेकर घराबाहेर पडताना ‘जिवंत परत येऊ का?’ अशा दहशतीखाली जगत आहेत. केवळ साडेतीन किलोमीटरच्या या रस्त्यावर गेल्या साडेचार वर्षांत तब्बल 51 भीषण अपघात झाले असून, आतापर्यंत 21 निष्पापांना नाहक जीव गमवावा लागला आहे. नुकताच सिल्व्हर ओक सोसायटीसमोर डंपरच्या चाकाखाली चिरडून एका 15 वर्षांच्या दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा झालेला दुर्दैवी अंत ही केवळ दुर्घटना नसून, पुणे महानगरपालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नियोजनशून्य व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खूनच आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी

10 वर्षांपूर्वी केवळ राजकीय श्रेय लाटण्यासाठी या रस्त्याच्या रुंदीकरणाचा नारळ घाईघाईत फोडला गेला. प्रत्यक्ष जागा ताब्यात नसताना कोट्यवधी रुपयांची उधळपट्टीझाली खरी; पण रस्ता अजूनही सलग झालेला नाही. 84 मीटरचा मूळ आराखडा गुंडाळून तो 50 मीटरवर आणला गेला, तरीही 10 मिळकतींचे भूसंपादन गेल्या कित्येक वर्षांपासून लालफितीत अडकले आहे. मार्च 2027ची नवी ‘डेडलाइन’ कागदावर जाहीर करणाऱ्या महापालिकेला रस्त्याच्या मधोमध उभे असलेले विजेचे महाकाय खांब हटवण्याची सुद्धा साधी अक्कल सुचलेली नाही.

Maharashtra TimesSatara Crime : बाथरुमच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर, रेक्टरचे बेछूट आरोप, साताऱ्यात सृष्टीने आयुष्य संपवलं, पोलिसांनी कारवाईचा फास आवळला

मनमानी पद्धतीने यू-टर्न

कात्रज चौक ते राजस सोसायटीदरम्यान सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे कपिलअमृत डेअरीजवळ मनमानी पद्धतीने यू-टर्न काढण्यात आला आहे. कात्रज तलावाजवळून पालिकेचीच अवजड कचऱ्याची वाहने आणि माउलीनगरकडून येणारे चालक सर्रास उलट्या दिशेने वाहने घुसवतात. रोज 50 वाहतूक वॉर्डन नियुक्त केल्याचा कागदी दावा करणाऱ्या प्रशासनाला रस्त्यावर प्रत्यक्षात एकही वॉर्डन नियंत्रणासाठी उतरवता येत नाही.

डांबराचा लवलेश नसलेले मोठे-मोठे खड्डे

रस्त्यावर एका बाजूला खोदकाम, दुसऱ्या बाजूला वाहनांची तुंबलेली गर्दी आणि मधोमध डांबराचा लवलेश नसलेले मोठे-मोठे खड्डे, अशा नरकयातनांतून शाळकरी मुलांना रस्ता ओलांडावा लागतो. पादचाऱ्यांसाठी सुरक्षित मार्गिका नाही, पथदिव्यांचा बोजवारा उडाला आहे, तरीही स्थानिक आमदार, आजी-माजी नगरसेवक आणि प्रशासकीय धुरीण मूक गिळून गप्प बसले आहेत.

Maharashtra TimesPune Crime : रुमचं भाडं थकलं, खाण्यापिण्याचा खर्च अन् अभ्यासाचा ताण; पैशांच्या अडचणीमुळे अधिकारी होण्यासाठी पुण्यात आलेल्या तरुणाचं टोकाचं पाऊल

सामान्य करदात्यांच्या जीवाशी खेळ

दंड वसुलीसाठी कात्रज चौकात टपून बसणाऱ्या वाहतूक विभागाला या रस्त्यावरील जीवघेणी अनागोंदी दिसत नाही का? असा संतप्त सवाल आता पुणेकर विचारत आहेत. विविध विभागांतील समन्वयाचा अभाव आणि ठेकेदारांचे लाड पुरवण्याच्या नादात सामान्य करदात्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. ‘दौरे आणि घोषणा’ बंद करून हा रस्ता तत्काळ सुरक्षित करणार? की आणखी निष्पापांचे बळी जाण्याची वाट पाहणार? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा