Satara Student Srushti Biramane Death Case : बाथरुमच्या भिंतीवर रेक्टरबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे समोर आले होते. त्यामुळे रेक्टरने केलेल्या तक्रारीनंतर दोन विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून घेतले गेले. परंतु सृष्टीने हॉस्टेलमध्येच आयुष्याची अखेर केली
रेक्टरला अटक
‘फूड टेक्नॉलॉजी’च्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेणाऱ्या सृष्टी बिरामणे हिचा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील तीन मजली वसतिगृहावरुन खाली उडी मारल्याने मृत्यू झाला. तीन दिवसांनंतर, ५ सप्टेंबर रोजी तिचे वडील भानुदास बिरामणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि वसतिगृह अधीक्षिका जयश्री जाकते यांना अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, रेक्टर, प्राचार्य आणि समुपदेशन समितीच्या सदस्यांवर ‘भारतीय न्याय संहिते’नुसार जीव देण्यास प्रवृत्त करण्याशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sarkhej Murder Case : मित्रासोबत व्हिडिओ व्हायरल झाल्याचा राग, पिता-पुत्राने लेकीला संपवलं, निर्जन जागी अपघाताचा बनाव, एका क्लूने पितळ उघडं“आम्ही रेक्टरला अटक केली आहे. प्राचार्य आणि समुपदेशन समितीच्या सदस्यांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत” असे सातारा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की, रेक्टरला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची पोलीस कोठडी घेण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. इतर आरोपींना अद्याप अटक झालेली नाही.
हॉस्टेलमधील वाद
एफआयआरनुसार, वसतिगृहातील अस्वच्छता, परिसराची दुर्दशा आणि मेसच्या सुविधांशी संबंधित तक्रारींवरुन हा वाद निर्माण झाला होता. हॉस्टेलमधील परिस्थितीमुळे काही विद्यार्थिनी नाराज होत्या आणि नंतर बाथरुमच्या भिंतीवर रेक्टरबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचे समोर आले होते.
रेक्टरने महाविद्यालयाच्या समुपदेशन समितीकडे तक्रार केली होती; त्यानंतर समितीने गैरवर्तनाचा आरोप असलेल्या दोन विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावून घेतले होते.
Rohan Parekh : रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट
विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावलं
आपल्या तक्रारीत बिरामणे यांनी आरोप केला की, त्यांच्या मुलीने त्यांना या घडामोडींबद्दल आणि वसतिगृहातील काही विद्यार्थिनींवर निर्माण झालेल्या दबावाबद्दल माहिती दिली होती. गैरवर्तनाचा आरोप असलेल्या दोन मुली उडी मारण्याच्या उद्देशाने वसतिगृहाच्या गच्चीवर धावल्या होत्या, परंतु त्यातील एका मुलीला इतर विद्यार्थिनींनी रोखले होते.
वडिलांनी आरोप केला की, रेक्टरने सृष्टीला धमकावले आणि तिच्यावर दबाव टाकला; तसेच तिला वसतिगृहातून काढून टाकण्याची धमकीही दिली. त्यांनी असाही दावा केला की, महाविद्यालयीन प्राचार्यांनी हस्तक्षेप केला नाही आणि समुपदेशन समितीने अशा परिस्थितीत अपेक्षित असलेला आधार किंवा मार्गदर्शन दिले नाही.
Kanpur Murder Case : जुन्या नोकराशी चॅटिंग, 49 व्हॉट्सअप मेसेज डिलीट, 309 वेळा कॉल; कोट्यधीश सासऱ्याच्या मारेकरी सुनेचे कारनामे समोरबिरामणे यांनी असाही आरोप केला की, विद्यार्थिनींवर कारवाई सुरू करण्यात आली असली तरी, आक्षेपार्ह मजकूर नेमका कोणी लिहिला होता हे शोधण्यासाठी कोणतीही योग्य चौकशी करण्यात आली नाही. मृत्यूपूर्वी सृष्टीने इंग्रजी भाषेत एक छोटी चिठ्ठी लिहिली होती. आता पोलीस तपासाचा भाग म्हणून या आरोपांची, वसतिगृहाच्या नोंदींची आणि विद्यार्थिनींच्या जबाबांची पडताळणी करत आहेत.
