Nashik Crime: अनिकेत हा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ भाड्याच्या खोलीत मित्रांसोबत राहत होता.
हा हल्ला रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास सामनगाव येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय पासून रेल्वे पोलिस प्रशिक्षण महाविद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरील हनुमान मंदिर परिसरात घडला. यात अनिकेत बाजीराव खताळे (रा. पाटोळे, ता. सिन्नर) आणि सिद्धान्त खैरनार (रा. सटाणा) हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दोघेही विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहेत.
नाशिककरांनो सावधान! आता सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास 150पासून 10 हजारांचा दंड, मनपाचा मोठा निर्णयखताळे याच्या गावाशेजारील एक विद्यार्थिनी त्याच्या वर्गात शिकते, त्यामुळे त्यांच्यात ओळख होती. या विद्यार्थिनीला कार्तिक जाधव (रा. मनेगाव) हा विद्यार्थी फोन आणि मेसेज करून त्रास देत असल्याचा आरोप आहे. अनिकेतने कार्तिकला संबंधित मुलीला त्रास न देण्याबाबत सांगितले होते. याचा राग आल्याने कार्तिकने इतर साथीदारांसह पाटोळे येथे जाऊन अनिकेतला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, अनिकेतच्या मामाने मध्यस्थी केल्यानंतर कार्तिक वाद मिटविण्यास तयार झाल्याचे समोर आले आहे.
Nashik News: एक चूक दाखवा, मी नाव बदलेन! नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्रींचे टीकाकारांना ओपन चॅलेंजवाद मिटविण्याच्या बहाण्याने बोलावले
कार्तिक याने अनिकेतला फोन करून वाद मिटविण्यासाठी रात्री साडेनऊच्या सुमारास घटनास्थळी बोलावले. तो मित्र आविष्कार हरळे आणि सिद्धान्त खैरनार यांना सोबत घेऊन गेला. तेथे कार्तिकने अनिकेतला बाजूला घेतले आणि जॅकेटमध्ये लपवलेल्या कोयत्याने त्याच्या डोक्यावर दोन वार केले. तिसरा वार अनिकेतने उजवा हात आडवा करून रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याच्या हाताच्या नसा तुटल्या. त्यानंतर तो कोसळला. त्याच्या मदतीसाठी धावलेल्या सिद्धान्त खैरनारच्या पोटावरही कार्तिकने कोयत्याने वार केला. तोही रस्त्यावरच कोसळला. आविष्कार हरळे धावत येताच कार्तिक साथीदारांसह दुचाकीवरून फरार झाला. यानंतर आविष्कारने इतर विद्यार्थ्यांना बोलावून दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले.
