• Thu. Sep 10th, 2026

म. टा. प्रतिनिधी, जालना : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिलीभगत आहे. शिंदे हे फडणवीस यांना विचारल्याशिवाय काहीही करीत नाहीत. मराठा आरक्षणाबाबत सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करीत आहे. आता मुंबईत जावेच लागणार आहे. येत्या १२ तारखेला राज्यातील सर्व मराठा बांधवांनी अंतरवाली सराटीत यावे’ असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी केले.

‘मुंबईकडे जाताना आमच्यावर हल्ला करायचा हा सरकारची योजना आहे’, असे सांगून सांगली ,सोलापूर,पुणे,कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, नवी मुंबई नगर,नाशिक,जळगाव,नागपूर,धुळे, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यातील सर्वपक्षीय मराठ्यांनी १२ तारखेला या बैठकीला यावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. त्यादिवशी मुंबई आंदोलनाची तारीख ठरेल. त्या तारखेला सर्वांनी मुंबईत यावे.

Ramesh Mhatre Case: अशांना मोकळे सोडता कामा नये, नगरसेवक म्हात्रे प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा संतापदरम्यान, मराठा आंदोलकांनी धुळे सोलापूर महामार्गावर सोमवारी दिवसभरात वडीगोद्री येथे दोन वेळा, हॉटेल औदुंबर आणि रामगव्हाण येथे रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर वाहतूक सुरळीत चालू झाली.

Maharashtra TimesManoj Jarange: अजितदादांसारखा एवढा मोठा माणूस असा मरत असतो का? जरांगे पाटलांची विमान अपघाताच्या तपासावर शंकारस्त्यावर उतरण्याचा तायवाडेंचा इशारा

नागपूर : ‘मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकार ओबीसी आरक्षणाबाबत काय भूमिका घेते, याकडे समाजाचे लक्ष लागले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का देणारा कोणताही निर्णय झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू,’ असा इशारा ‘राष्ट्रीय ओबीसी महासंघा’चे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिला आहे. सरकारची भूमिका ओबीसींच्या हिताची आहे की विरोधातील, यावर महासंघाचे लक्ष आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय झाल्याचे स्पष्ट झाल्यास संघटनेकडून आंदोलनाची भूमिका घेतली जाईल. मात्र, सध्या आंदोलनाची घोषणा केलेली नाही, असे तायवाडे यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesMaratha Reservation: मराठा आरक्षणावर राज्य सरकारचे ४ मोठे निर्णय; जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर विद्यार्थ्यांसाठी योजनांची घोषणा‘एमपीएससी’च्या विरोधात मोर्चा

‘एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेतलाच पाहिजे…’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘तानाशाही नही चलेगी’, ‘विद्यार्थी एकजुटीचा विजय असो…’ अशा घोषणांनी सोमवारी पुण्याचा मध्यवर्ती भाग दणाणून गेला.स्पर्धा परीक्षांचे स्वतंत्र ऑडिट करून, गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे (एमपीएससी) अध्यक्ष आणि दोषी अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा, कार्यक्षम सनदी अधिकारी नेमावा, पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आदी मागण्यांनी विद्यार्थ्यांनी सरकारला थेट इशारा दिला. सरकारने तीन दिवसांत मागण्यांची दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धारही विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed