Pune to Konkan Railway 10 Rounds : पुण्यातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता, पुण्यातूनही १२ ते २६ सप्टेंबरदरम्यान रेल्वेच्या १० फेऱ्या करण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक ०१४४५ पुणे-रत्नागिरी
गाडी क्रमांक ०१४४५ पुणे-रत्नागिरी विशेष १५ आणि २२ सप्टेंबर रोजी पुणे स्थानकातून मध्यरात्री १२.२५ वाजता सुटून त्याच दिवशी सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीची ०१४४६ रत्नागिरी-पुणे विशेषत्याच दिवशी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात दाखल होईल; तसेच ०१४४७ पुणे-रत्नागिरी विशेष १२, १९ आणि २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२.२५ वाजता पुण्याहून सुटेल आणि सकाळी ११.५० वाजता रत्नागिरीला पोहोचेल. ०१४४८ रत्नागिरी-पुणे विशेष त्याच दिवशी सायंकाळी ५.५० वाजता रत्नागिरीहून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी पहाटे ५.२० वाजता पुण्यात येईल.
Pune News : ‘डीजे’विरोधात ध्वनिवर्धन! पुण्यातील मोर्चात बंदीची मागणी, राजकीय नेत्यांचाही समर्थनाचा सूर, पण मोर्चाला विद्यानंद बापट अनुपस्थित; कारण काय?
१५ स्थानकांवर थांबे
या विशेष गाड्यांना येता-जाता चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. विशेष गाड्यांसाठी नियमानुसार विशेष शुल्क लागू राहणार आहे.
आधी मेट्रो सुरू करा; नंतर श्रेय लाटा
‘हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन गेल्यावर्षीच होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, उद्घाटनासाठी वेळ मिळत नसल्याचे कारण पुढे करून कामे रखडवली जात आहेत. मेट्रो सुरू करण्यासाठी आता फीत कापण्याची गरज नाही. आधी मेट्रो थेट सुरू करा, त्यानंतर हवे तेवढे मोठे होर्डिंग लावून खुशाल श्रेय लाटत राहा,’ अशा शब्दांत माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
Satara News : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, आरोपीचा पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर घातपात
हिंजवडीतील अपुऱ्या नागरी सुविधांविरोधात आयटी अभियंते आणि स्थानिक नागरिकांनी काढलेल्या मोर्चात ठाकरे सहभागी झाले होते. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मेट्रोचे रखडलेले काम, रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीवरून सरकारला लक्ष्य केले. मेट्रोच्या कामांमुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.
‘जिथे उद्योग आणि ‘आयटी’चे वैभव दिसायला हवे, तिथे रस्त्यांवर कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. मुख्यमंत्र्यांनी इच्छाशक्ती दाखवली; तर ही कामे एका आठवड्यात मार्गी लागू शकतात,’ असा दावा ठाकरे यांनी केला.
Satara News: साताऱ्यातील १९ वर्षीय तरुणीच्या मृत्यू प्रकरणाला गंभीर वळण; हॉस्टेलमध्ये नेमकं काय घडलेलं? वडिलांनी सांगितलं
मुख्यमंत्र्यांनी भेट न घेतल्याचा आरोप
‘मुख्यमंत्री हिंजवडीच्या अगदी जवळ येऊन गेले; मात्र त्यांनी वेळ काढून ‘आयटी’ क्षेत्रातील त्रस्त कर्मचाऱ्यांची भेट घेतली नाही. महाराष्ट्रातील जनता ‘जीएसटी’च्या रुपाने केंद्राला भरघोस कर देते. त्याचा परतावा राज्याला किती मिळतो, याचे उत्तर सरकारने द्यावे. पुणेकरांचे हाल थांबवण्यासाठी हिंजवडी मेट्रो तातडीने सुरु करणे हीच काळाची गरज आहे’, असेही ठाकरे म्हणाले.
