• Wed. Sep 9th, 2026

Thane Cyber Crime:ठाण्यात ऑनलाइन सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून ३५१ गुन्ह्यांत ८४ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे शेअर मार्केट, गुंतवणूक बचत, आणि पॉलिसीशी संबंधित आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
महेश गायकवाड,ठाणे:‘शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळेल’, अशा आमिषापासून ते ‘फसव्या लिंक’, ‘एपीके फाइल’, ‘बनावट संदेश’ पाठवून, तसेच ‘मोबाइल हॅकिंग’, ‘डिजिटल अटकेची’ भीती दाखवून सायबर गुन्हेगार नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत.

फसवणुकीचे ३१५ गुन्हे

यंदा ठाणे पोलिस आयुक्तालयात ऑनलाइन आर्थिक फसवणुकीप्रकरणी दाखल झालेल्या ३५१ गुन्ह्यांमध्ये गुन्हेगारांनी तब्बल ८४ कोटी रुपयांची लुबाडणूक केली आहे. या गुन्ह्यांपैकी अवघे ८ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. एकूण गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक ९५ गुन्हे शेअर मार्केट , गुंतवणूक, बचत आणि पॉलिसीशी संबंधित आहेत. या गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कमही सर्वाधिक, म्हणजे ३३ कोटी रुपये आहे.

ऑनलाइन फसवणुक

या टोळ्या नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीच्या जाळ्यात ओढून त्यांच्या बँक खात्यातीलपैशांवर डल्ला मारतात. दुसरीकडे, गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने सायबर गुन्हेगारी अधिकच फोफावली आहे. तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला अशा सर्वांनाच गुन्हेगार लक्ष्य करत आहेत.

‘डिजिटल अटक’

काही प्रकरणांत ‘डिजिटल अटक’ केल्याची भीती दाखवली जाते. तर, तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ असल्याच्या भूलथापा मारून ऑनलाइन माध्यमातून नागरिकांकडून मोठी रक्कम उकळली जात आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या गुन्ह्यांमध्ये ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार सर्वाधिक आहेत.

२५ आरोपींना अटक

ऑनलाइन फसवणुकीसंदर्भात दाखल झालेल्या ३५१ गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम ८४ कोटी १३ लाख ४५ हजार रुपये आहे. या गुन्ह्यांपैकी २८ गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी २५ आरोपींना अटक केली आहे. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अवघे ८ टक्के असून, काही प्रकारांतील ऑनलाइन फसवणुकीच्या एकाही गुन्ह्याची उकल झालेली नाही.

Maharashtra TimesPune News : गणेशोत्सवासाठी पुण्यातून कोकणात जाणाऱ्यांना दिलासा! रेल्वेच्या 10 विशेष फेऱ्या, कधीपासून सुरु होणार?

शेअर मार्केट, पॉलिसीशी संबंधित गुन्हे जास्त

एकूण ३५१ गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक नोंद झालेल्या शेअर मार्केट, गुंतवणूक, बचत आणि पॉलिसीशी संबंधित ९५ गुन्ह्यांत ३३ कोटी १० लाख रुपयांची सायबर लूट झाली आहे. या गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे, म्हणजे ८.४२ टक्के गुन्हे उघडकीस आले आहेत. फसवणूक, फिशिंग कॉल, एसएमएस आणि लिंकशी संबंधित गुन्ह्यांची संख्या ७२ असून, या गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम ३० कोटी ५३ लाख रुपये आहे. यापैकी केवळ दोन गुन्हे उघडकीस आले असून, हे प्रमाण २.७७ टक्के आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा