Navi Mumbai Cab Driver assault Lady Passenger : नवी मुंबई विमानतळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एअरपोर्ट सर्व्हिस रोडवर मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवली .नंतर तो मागच्या सीटवर असलेल्या महिलेच्या बाजूला जाऊन बसला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी मुंबई : मुंबईतील चेंबूर भागात एका पार्टीला हजेरी लावून पनवेलमधील घरी परतणाऱ्या एका महिला प्रवाशासोबत गैरवर्तन झाल्याचा धक्कादायत प्रकार समोर आला आहे. शनिवारी रात्री उशिरा नवी मुंबई विमानतळाजवळील एका निर्जन रस्त्यावर गाडी थांबवत कॅब चालकाने तिचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले.
नवी मुंबई विमानतळाच्या जवळ घटना
ही घटना नवी मुंबई विमानतळापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एअरपोर्ट सर्व्हिस रोडवर मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. आरोपीने पाणी पिण्याच्या बहाण्याने टॅक्सी थांबवली आणि नंतर तो मागच्या सीटवर असलेल्या महिलेच्या बाजूला जाऊन बसला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पार्टीनंतर एका मैत्रिणीने टॅक्सी बुक केल्यानंतर पीडिल महिला पनवेल येथील घरी जात होती.
Girl jumps in Chinab : हे माझं आयुष्य, माझं मन सांगतंय… बाय बाय बाबा; फोनवर शेवटचं बोलणं, लेकीने नदीपात्रात झोकून दिलं
हात धरुन कपडे काढण्याचा प्रयत्न
“कॅब चालकाने निर्जन सर्व्हिस रोड गाडी थांबवली, थोड्या वेळासाठी बाहेर उतरला आणि नंतर पुन्हा गाडीत शिरुन मागच्या सीटवर महिलेच्या बाजूला बसला. त्याने तिचा हात पकडला आणि तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला” असे नवी मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ती महिला कशीबशी स्वतःची सुटका करुन गाडीतून निसटण्यात यशस्वी झाली, त्यानंतर चालक घटनास्थळावरुन पळून गेला.
आरोपीवर गुन्हा, शोध सुरु
घटनेनंतर त्या महिलेने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी ते पनवेल पोलीस ठाण्यात गेले. ही घटना नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे, पनवेल पोलिसांनी तिला संबंधित पोलीस ठाण्यात नेले. तिच्या तक्रारीच्या आधारे, नवी मुंबई विमानतळ पोलिसांनी मोहम्मद अफझल शेख नावाच्या आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
Nisar Wayanad : उदित नारायणच्या आवाजाशी साम्य, भारतीय गायकाचा दुबईत अंत, कॉन्सर्टच्या तोंडावर प्राणज्योत मालवलीपोलिसांनी आरोपी कॅब चालकाचा शोध सुरू केला असून, त्याचा ठावठिकाणा शोधण्यासाठी तांत्रिक गुप्तचर यंत्रणेचा वापर केला जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. अत्याचाराशी संबंधित प्रकरणांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पीडितेच्या गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी तिची ओळख उघड करण्यात आलेली नाही.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा