मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दहावा दिवस आहे. अशातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी भेट दिली. दानवे यांनी जरांगे यांच्यासोबत काहीवेळ चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना आंदोलन हाताबाहेर गेलं तर लोकं रस्त्यावर उतरतील, असा इशारा सरकारला दिला.