• Thu. Sep 10th, 2026

भाजप नेते मनसेच्या वाटेवर, अडीच वर्षांनी १०० टक्के आमदार होणार, राजू पाटील यांचं मोठं विधान

ByMH LIVE NEWS

Sep 7, 2026 #mt

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

“१०० टक्के मी आमदार होणार”, असं मोठं विधान मनसे नेते राजू पाटील यांनी केलं आहे. पुढच्या अडीच वर्षांत मी आमदार होईन, असा दावा राजू पाटील यांनी केला. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा मनसेत घरवापसी केली आहे. राजू पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळीच कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं. तसंच २०२४ च्या निवडणुकीतील मतदानावर गंभीर आरोप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed