• Mon. Sep 7th, 2026

Pune News : ‘डीजे’विरोधात ध्वनिवर्धन! पुण्यातील मोर्चात बंदीची मागणी, राजकीय नेत्यांचाही समर्थनाचा सूर, पण मोर्चाला विद्यानंद बापट अनुपस्थित; कारण काय?

Pune Protest Against DJ : ‘सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ‘डीजे’च्या वापराबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे. यासंदर्भात निर्णय आणि कायदेशीर चौकट आधीच निश्चित करण्यात आली आहे. प्रशासन विद्यमान नियमांनुसारच कार्यवाही करेल’, असं सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी म्हटलं आहे.

पुणे डीजेबंदी मोर्चा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘डीजेबंदी’विरोधात ध्वनिवर्धनाचे चित्र रविवारी राज्यातील विविध भागांत दिसले. ‘डीजे’च्या दणदणाटामुळे त्रासलेले शेकडो पुणेकर रविवारी रस्त्यावर उतरले. ‘सोलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये ‘डीजे’बंदी होऊ शकते, तर पुण्यात का नाही,’ असा संतप्त प्रश्न त्यांनी केला. दुसरीकडे, विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनीही ‘डीजे’बंदीच्या सुरात सूर मिसळला. सार्वजनिक उत्सवातील गोंगाटाविरोधात पुण्यात विद्यानंद बापट यांनी आवाज उठविल्यानंतर ‘डीजे’विरोधात आता लोकचळवळ उभी राहिल्याचे चित्र रविवारी दिसून आले. ‘डीजे, ध्वनिवर्धक बंदीशिवाय आता माघार नाही’ असा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला.

‘लाउड स्पीकरविरोधी पुणेकर मंच’

स्पीकरच्या भिंतीवर बंदी घाला, तसेच ढोल-ताशा पथकांचे वादन सर्वोच्च न्यायालयाने आवाजाबाबत आखून दिलेल्या नियमांमध्ये व्हावे, अशी मागणी करणारेविद्यानंद बापट यांना महापालिकेच्या नागरी सभेतून बाहेर काढण्यात आले होते. गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना बापट यांना मारहाण करण्यात आली. या घटनेचा निषेध आणि स्पीकरच्या भिंतींवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ‘लाउड स्पीकरविरोधी पुणेकर मंच’ने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत पुणेकर मोर्चामध्ये सहभागी झाले. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक ते महानगरपालिका या दरम्यान निघालेल्या मोर्चात नागरिकांचा रोष पाहायला मिळाला. सर्व धर्मीय आणि राजकीय उत्सवांमध्ये कर्कश ध्वनिवर्धकावर बंदी घाला, अशी मागणी यावेळी करण्यात आली. ‘डीजेबंदी झालीच पाहिजे’, ‘शांतता आमचा हक्क आहे’, ‘आवाज बंद कर डीजे, तुला पुणेकरांची शपथ हाय’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

Maharashtra TimesSatara News : आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय, आरोपीचा पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर घातपात

सुरक्षेच्या काराणास्तव बापट अनुपस्थित

पुण्यात दणदणाटाविरोधात आवाज उठवणारे विद्यानंब बापट यांच्यावर गेल्या आठवड्यात हल्ला झाला होता. एका वृत्तावाहिनीशी बोलताना बापट यांना एका तरुणाने मारहाण केली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बापट या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. मात्र, त्यांच्या ‘डीजे’ बंदीच्या मागणीला बळ मिळाल्याचे चित्र रविवारी पुण्यात दिसले.

‘सण-उत्सवासाठी नियमावली हवी’

‘सण-उत्सवांमध्ये डॉल्बी आणि डीजे का लावता? सण पारंपारिक पद्धतीने का साजरे होत नाहीत?’ असे प्रश्न करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सण-उत्सवासाठी नियमावलीची आवश्यकता अधोरेखित केली. ‘गोविंदांच्या मंचावर नाच केले जातात, ही उत्तरेकडील संस्कृती आहे. महाराष्ट्राने इतरांचे अनुकरण का करावे?’ असा प्रश्नही त्यांनी केला.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा