• Thu. Sep 10th, 2026

Yavatmal News: यवतमाळमध्ये भूदानची 33 हजार एकर जमीन बेपत्ता; गैरव्यवहाराची चौकशी सुरु, मोहा गावातील 50 जणांना नोटीस

Bhoodan Land Scam: आज मोहा गावाजवळ मुख्य मार्गावरील जमिनीचे दर प्रति एकर दीड ते दोन कोटी रुपये एकर आहेत, असेही तक्रारीतून स्पष्ट करण्यात आले आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
आरती गंधे, यवतमाळ : यवतमाळ शहराजवळील मोहा येथे भूदानात मिळालेल्या जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत भूदान यज्ञ मंडळाने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन, उपविभागीय अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. यात ५० जणांना नोटीस पाठविल्या आहेत. ‘भूदानची ३३ हजार एकर जमीन बेपत्ता’ अशा आशयाचे वृत्त ‘मटा’ने दिले होते. यानंतर या प्रश्नाला वाचा फुटली आहे.

आचार्य विनोबा भावे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हजारो एकर जमीन भूदानात दिली. विदर्भात सर्वाधिक जमीन यवतमाळ जिल्ह्यात मिळाली. पण, त्याच यवतमाळ जिल्ह्यात भूदानात मिळालेल्या जमिनीचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ शहराचा भाग झालेल्या धामणगाव मार्गावरील मोहा येथे शेतकऱ्यांनी हजारो एकर जमीन दान केली होती. आज मात्र त्या जमिनीचा लाभ भूमिहीन शेतकऱ्यांना झालेला दिसत नाही. भूदानाच्या जमिनीवर ले-आउट पडले आहेत. अनेक ठिकाणी मोठे बंगले, वसाहती, महाविद्यालये, खासगी शाळा उभ्या राहिल्या आहेत. शहराचा विस्तार झाल्यावर ग्रामीण भाग शहराशी जोडला गेला. त्याचाच फायदा शहरातील काही बिल्डर लॉबीने घेतला. महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून भूदानातील जमिनीची विक्री करण्यात आली. हजारो रुपयांत जमिनी घेऊन कोट्यवधी रुपयांमध्ये त्याची विक्री झाली.

Maharashtra TimesNilesh Kamalkar : ज्या शाळेने घडवलं, त्याच शाळेत शिक्षक बनून घडवले क्रीडापटू; कोण आहेत निलेश कमलकर?भूदान यज्ञ मंडळाचे अंकेक्षण विभागाचे संयुक्त सचिव नरेंद्र बैस यांनी उपविभागीय अधिकारी यांना पत्र पाठवून मोहा येथील भूदानात मिळालेल्या जमिनीबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. नियमात नसताना मोहा सर्वोदय ग्राम परिसर सहकारी संस्था यांना भूदानातील ४२८.१७ हेक्टर आर जमीन त्यांच्या सभासदांना वाटप करण्यासाठी दिली होती. ही संस्था केव्हाच बरखास्त झाली. पण, त्या संस्थेला देण्यात आलेली भूदानातील जमीन कोणाकडे आहे याची काहीच माहिती नाही. मध्य प्रदेश भूदान यज्ञ अधिनियम, १९५३च्या कायद्याप्रमाणे जमीन मिळालेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे हस्तांतरणास मनाई आहे.

भूदान यज्ञ मंडळाचा अधिकाऱ्यांवर संताप

भूदानात मिळालेल्या जमिनीला कूळ कायदा लागत नाही. पण, मोहामध्ये कूळ दाखवून त्याची विक्री करण्यात आली. महसूल अधिकाऱ्यांनी ते खरेदी व्यवहार नियमित केले असे दिसत आहे. २०१०पासून भूदान यज्ञ मंडळ मोहा येथील भूदानातील जमिनीची माहिती जमा करीत आहे. पण, तलाठी व इतर महसूल कर्मचारी यांचे सहकार्य मिळत नाही. मोहामध्ये भूदानातील काही जमीन बेंबळा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रतांसाठी घेण्यात आली. पण, आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही. शासकीय अधिकारीच नियमांचा भंग करीत असतील तर इतरांचे काय, असा सवाल भूदान यज्ञ मंडळाच्या विदर्भ विभागाचे सचिव एकनाथ डगवार यांनी केला.

Maharashtra TimesCrime News: शेअर मार्केटमुळे कंगाल, कर्ज फेडण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ पाहून टाकला दरोडा, पण अचानक एक जण आला अन् अजयच्या हातून आक्रित घडलं!भूदान यज्ञ मंडळाने भूदानातील जमिनीबाबत पाठविलेल्या पत्राच्या आधारावर पडताळणी सुरू आहे . काही ठिकाणी नियमांचा भंग झाल्याचे दिसत आहे. भूदान जमिनीवर ले-आऊट दिसत आहे. त्याची चौकशी सुरू आहे. -गोपाळ देशपांडे, उपविभागीय अधिकारी यवतमाळ

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा