Baramati Accident News : पुण्यातील बारामतीमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दहीहंडीसाठी बारामतीहून पुण्याकडे जाताना तीन तरुणांचा भीषण अपघात झाला. या अपघातात 18 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दिवे घाट अपघात बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, बारामती : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा होत असताना पुण्यात मात्र, दुर्दैवी घटना घडली आहे. दहीहंडी उत्सवासाठी बारामतीकडून पुण्याच्या दिशेने दुचाकीवरून निघालेल्या तीन तरुणांचा दिवे घाटात अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्यावर घसरल्यानं झालेल्या या दुर्घटनेत गौरव चव्हाण (वय 18, रा. आमराई, बारामती) याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अन्य दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या सांगवीमध्ये देखील मृत्यूची घटना समोर आली आहे.
खाली पडताच वाहनाने चिरडलं
मिळालेल्या माहितीनुसार, बारामती येथील आमराई परिसरातील तीन तरुण दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी दुचाकीवरून पुण्याकडे जात होते. दिवे घाटात दुचाकी आली असता चालकाचं नियंत्रण सुटलं आणि दुचाकी रस्त्यावर घसरली. यामध्ये तिघेही खाली पडले. याचवेळी मागून येणाऱ्या वाहनाच्या चाकाखाली एक तरुण आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आलं. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दहीहंडीच्या उत्साहात पुण्याकडे जात असताना घडलेल्या या दुर्घटनेनं बारामती परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना दुचाकी चालविताना वेगावर नियंत्रण ठेवणं, हेल्मेटचा वापर करणं आणि वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे, याची जाणीव या घटनेनं पुन्हा करून दिली आहे.
बारामतीमधील प्रकरणाचे ओडिशापर्यंत धागेदोरे
बारामतीमधील जळोचीतील निर्जन शेतात दोन ड्रममध्ये सापडलेल्या तब्बल 478 किलो 950 ग्रॅम गांजाच्या प्रकरणाचा तपास आता आंतरराज्यीय पुरवठा साखळीपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात बारामती शहर पोलिसांनी विकी विजय कांबळे (रा. भीमनगर, जळोची; सध्या तांदुळवाडी, बारामती) याला बुधवारी 2 सप्टेंबर रोजी रात्री अटक केली. त्याला न्यायालयाने 7 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, गांजाचा स्रोत, ओडिशातून होणारी वाहतूक, स्थानिक साठवणूक आणि वितरण याबाबत महत्त्वाचे धागे कांबळेच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता आहे.
Water Level In Dams: नागपूरला जलसंकटाचा धोका; यंदा सरासरीच्या 61.8 टक्केच पाऊस, प्रमुख धरणांची काय स्थिती?
नेमकं हे प्रकरण काय आहे?
28 फेब्रुवारी रोजीजळोची-पिंपळी रोड परिसरातील एका शेतात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. कारवाईदरम्यान तेथे ‘समृद्धी अॅक्वा’ कंपनीचे 1500 लिटर क्षमतेचे दोन मोठे प्लास्टिक ड्रम आढळले. या ड्रममध्ये 465 पॅकेट्समध्ये 478 किलो 950 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी ड्रमसह सुमारे 2 कोटी 39 लाख 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा