• Fri. Sep 11th, 2026

Amruta Fadnavis : ‘मंत्र्यांची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते’, अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?

अमृता फडणवीस नागपूर येथे आयोजित दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या. यावेळी त्यांना त्यांच्या गरब्यामध्ये मुस्लीम व्यक्तीस सहभागी होऊ द्यावे या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर अमृता फडणवीस यांनी भूमिका मांडली.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांनी नवरात्रीत गरबाच्या कार्यक्रमांमध्ये कुणी इतर समाजाचा व्यक्ती सहभागी होण्यासाठी इच्छुक असेल तर त्याला सहभागी करुन घ्यावं, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचे अनेकांकडून स्वागत करण्यात आलं. तसेच त्यांच्या वक्तव्याची चर्चा होत असताना त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं. नागपुरात दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

“खूप छान वाटत आहे. मुन्ना यादव आणि लक्ष्मी यादव यांनी आयोजित केलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी आलेली आहे. इथे स्त्रियादेखील दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. स्त्रियादेखील मनोरा करणार आहेत. खूप छान वाटत आहे”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. यावेळी अमृता फडणवीस यांना गरबामध्ये मुस्लीम समाजाच्या व्यक्तीला परवानगी देण्यास हरकत नसल्याच्या त्यांच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली.

Maharashtra TimesManoj Jarange Patil : एका फटक्यात संपाल, मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदेंना इशारा

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“तुम्ही मला कायम असे प्रश्न विचारुन, जी मंत्र्यांची बायको सगळ्यात जास्त ट्रोल होते त्याची उपाधी दिली आहे. मी खरंच सांगू इच्छित आहे. आपल्या धर्मात वेगवेगळे असे रंग आहेत. तुम्ही पाहिलं तर जगात सर्वात जास्त लोकं कोणता धर्म मानतात? तर ख्रिश्चन धर्म. ते लोकं आपल्या सर्व सणांमध्ये सगळ्या लोकांचा समावेश करतात. त्यांचे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन त्यांनी लोकांनादेखील सेलिब्रेट करायला लावले. ख्रिसमस लोकांनादेखील माहिती आहे. आपला इतका सुंदर सण आहे. दहीहंडी असेल, गरबा , नवरात्र असेल, कुणी श्रद्धेने येत असेल, काही त्रास देत नसेल, कुटुंबासोबत येत असेल, विश्वासाचा टिळा लावून येत असेल तर त्याला येऊ द्यावे, असे मला वाटते”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

लव्ह जिहादच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

“ही भूमिका पार्शली काही लोकांनी घेतली असेल काही तशी लव जिहाद यासारखी काही कारण असेल. पण याचा आपल्याला लाँग टर्म विचार करावा लागेल. तसे कायदे कठोर करावे लागतील. आपल्या मुलीला वेद, पुराण, महाभारत यांना माहित आहे का? स्वतःच्या धर्मावर त्यांचा विश्वास आहे का? त्यांना स्वतःचा धर्मावर गर्व आहे का? मग अशा केसेस कमी होतील किंवा हळूहळू या केसेस होणार नाहीत”, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली.

Maharashtra TimesPalghar Case : ‘तुमच्या हलगर्जीपणामुळेच नऊ आरोपी फरार’, मुंबई हायकोर्टाचे पालघर पोलिसांवर ताशेरे

दहीहंडीतील महिलांच्या नृत्यावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

“दहीहंडीचा उत्सव स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी मनोरा लावून होतो आहे. एक बॅलन्स साधला जातोय. मात्र काही ठिकाणी पुरुष मनोरा बनवतात तर दुसरीकडे महिलांना डान्स करायला लावतात. ते पण वेगवेगळ्या प्रकारचे नाच असतात. स्त्री-पुरुष समानता ठेवा. तुम्ही स्त्री आणि पुरुष पबमध्ये जातात तेव्हा दोघे नाचता ना? इथे मनोरा बनवता तेव्हा सगळे मनोरा बनवा. गरबा खेळता तेव्हा सगळे गरबा खेळतात. तसेच दोघे मनोराच बनवा”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.