• Sun. Sep 6th, 2026

Nagpur Husband Killed Wife : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

नागपूर मानकापूर पत्नीची हत्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या मानकापूर परिसरात 38 वर्षीय महिलेच्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. महिलेचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आल्यानंतर पोलिसांनी तिच्या पतीला अटक केली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचं नाव कृष्णलाल शिवराम यादव (वय 41) असं आहे. तर मृत महिलेची ओळख यामिनी कृष्णलाल यादव (वय 38) अशी झाली आहे. यामिनी या पती कृष्णलाल यादव याच्यासोबत मानकापूर येथील झिंगाबाई टाकळी परिसरातील गोविंद सिटी टॉवरमध्ये राहत होत्या.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, काल गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारासयामिनी यांची अचानक प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. महिलेच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाल्यानं तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढलं. अहवालात यामिनी यांचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाल्याचं नमूद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच महिलेच्या शरीरावर काही जखमांच्या खुणाही आढळून आल्या. त्यामुळे हा नैसर्गिक किंवा आकस्मिक मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय पोलिसांना आला.

Maharashtra TimesVidyanand Bapat : बापट कुटुंबात संस्कृत पठणाची परंपरा, विद्यानंद पूर्वी नास्तिक नव्हता, परिस्थितीने बदलला; आई-वडिलांनी आठवणी सांगितल्या

आरोपी पतीला अटक

यानंतर मृत यामिनी यांचे मोठे भाऊ राजेंद्र यादव यांनी मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रारदाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी यामिनी यांचे पती कृष्णलाल शिवराम यादव याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर आज शुक्रवारी सप्टेंबर रोजी कृष्णलाल यादव याला पोलिसांनी अटक केली.

हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू

आरोपी कृष्णलाल यादव याच्याविरुद्ध यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. त्यामुळे पत्नीच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय होतं? याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे. पती-पत्नीमध्ये काही वाद झाला होता का? घटनेच्यावेळी नेमकं काय घडलं? आणि महिलेचा गळा कशा परिस्थितीत दाबण्यात आला? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. शवविच्छेदन अहवालाच्याआधारे पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. घटनास्थळी मिळालेले पुरावे, नातेवाईकांचे जबाब आणि आरोपीची चौकशी यावरून हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Maharashtra TimesPune Crime : पुण्यात 21 वर्षांच्या गर्भवतीने आयुष्य संपवलं, लग्नानंतर दहा महिन्यातच टोकाचं पाऊल, पतीसह सासू-सासऱ्यांवर गुन्हा
दरम्यान, यामिनी यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. संशयास्पद मृत्यूच्या या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली असली तरी हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मानकापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा