• Sun. Sep 6th, 2026

Nashik News: कृषिसेवा केंद्रांना दणका, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 13 केंद्रांचे परवाने निलंबित

नाशिक: खरीप हंगामात शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात कारवाई सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १३ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी ही कारवाई केली असून, आतापर्यंत १५४ परवाने निलंबित केले आहेत.

कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांची गुणवत्तापूर्ण विक्री सुनिश्चित करण्यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या अनुषंगाने परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या सुनावणीदरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

Ashram School: आश्रमशाळांमधील दोन विद्यार्थिनींचा करुण अंत; नाशिक जिल्ह्यातील घटना, 3 अधिकाऱ्यांचे निलंबनशेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून खरीप हंगामाचे नियोजन सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या निविष्ठांची विक्री किंवा जादा दराने विक्री होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हा अधीक्षक माने यांनी दिले आहेत.

५२ परवाने कायमस्वरूपी रद्द

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कारवाई सुरू आहे. ९ एप्रिल २०२६ पासून आजअखेर खते १०८, बियाणे २६ व कीटकनाशके २० असे एकूण १५४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. एकूण ५२ परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. राज्यात नाशिक हा सर्वाधिक परवान्यांवर कारवाई करणारा जिल्हा ठरला आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रांकडूनच बियाणे व खते खरेदी करावीत आणि खरेदीवेळी पक्के बिल अवश्य घ्यावे. कोणत्याही कृषी सेवा केंद्राकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी. तक्रारींसाठी तालुकानिहाय कृषी अधिकारी, गुणनियंत्रण व कृषी अधिकाऱ्यांच्या संपर्क क्रमांकावर तसेच जिल्हास्तरीय ७६२७०३७४०८ या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra TimesAbhijeet Dipke: आदिवासी आंदोलनाला ‘सीजेपी’चे बळ; मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत तळ ठोकण्याची दीपके यांची घोषणातपासणीत आढळल्या या त्रुटी

-तपासणीदरम्यान ई पॉस मशीनमध्ये अनियमितता असणे

-दर फलक व साठाफलक अद्ययावत नसणे

-अभिलेखे व्यवस्थित न ठेवणे, एन फॉर्ममध्ये साठा रजिस्टर न ठेवणे

-शेतकऱ्यांना पावती न देणे

तालुकानिहाय कृषी अधिकारी (गुणवत्ता नियंत्रण) यांचे संपर्क क्रमांक

  • नाशिक ९१८५२१५३६९
  • इगतपुरी ९१८५२१५६२९
  • त्र्यंबकेश्वर ९१८५२१५४००
  • पेठ ९१८५२१५४८७
  • निफाड ९०११६१९६७५
  • सिन्नर ९१८५२१५१२८
  • येवला ९१८५२१५५८४
  • चांदवड ९१८५२१५१७२
  • कळवण ९१८५२१५२७४
  • देवळा ९१८५२१५३०५
  • दिंडोरी ९१८५२१५२२८
  • सुरगाणा ९१८५२१५३२४
  • मालेगाव ९१८५२१५५१७
  • बागलाण ९१८५२१५०६६
  • नांदगाव ९१८५२१५०२१
किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed