तीन सप्टेंबरपासून १० सप्टेंबरपर्यंतच्या आठवड्यामध्ये राज्यभरात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल. त्यानंतर विदर्भाला फायदा होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे विदर्भाला फायदा मिळू शकतो. त्या पुढच्या आठवड्यांसाठी वर्तवण्यात आलेल्या अंदाजाबद्दल खात्री कमी असली तरी नंतरच्या दोन आठवड्यांमध्ये मराठवाडा आणि कोकणाला फायदा होऊ शकेल.
Eknath Shinde: SRAचे दोन अधिकारी निलंबित; जोगेश्वरीतील प्रकल्पात सदनिका वाटपप्रकरणी कारवाईचे एकनाथ शिंदेंचे निर्देश१७ ते २४ सप्टेंबर या काळात उत्तर कोकणामध्ये ही तूट अधिक वाढेल, अशीही शक्यता आहे. त्यानंतर २४ सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीत अरबी समुद्रात पाऊस सक्रिय असण्याची शक्यता आहे. या वेळी गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांनाही फायदा होऊ शकतो. यंदा गोव्यामध्येही पावसाची मोठी तूट आहे.
एक जून ते चार सप्टेंबर या कालावधीत गोव्यामध्ये ३३ टक्के तूट असून कर्नाटकमध्ये २४ आणि केरळमध्ये २३ टक्के पावसाची तूट आहे. सप्टेंबरमधील पावसामुळे ही तूट भरून निघण्यास खूप मदत होईल का, याचा अंदाज दोन आठवड्यांनंतर येऊ शकेल. कोकण विभागामध्ये एक जून ते चार सप्टेंबर या काळात मुंबई शहर जिल्ह्यात दोन टक्के तूट, मुंबई उपनगर जिल्ह्यात दहा टक्के अतिरिक्त, पालघर जिल्ह्यात २५ टक्के अतिरिक्त, ठाणे जिल्ह्यात सात टक्के तूट, रायगड जिल्ह्यात सरासरीइतका, रत्नागिरी जिल्ह्यात १३ टक्के तूट तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के तूट आहे.
Dahi Handi 2026: दृष्टीआडची जिद्द, थरांवरची भरारी! 2017पासून महिला गोविंदांची परंपरा; यंदा तीन थरांचे आव्हान पेलणार कोयना धरण भरले
सातारा : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जुलैअखेरच्या अतिवृष्टीने दमदार पाणीसाठा झाला. त्यामुळे धरणात १०५ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला असून सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांच्या दुष्काळी भागाला दिलासा मिळाला आहे. या वर्षी सिंचनाची समस्या पूर्णपणे मिटली असून, दुष्काळी तालुक्यांना कोयनेचा पाणीसाठा यावर्षी वरदान ठरणार आहे. धरणात सध्या सात हजार ७३७ टीएमसी पाण्याची आवक आहे, तर पाणीसाठा १०५.२५ टीएमसीवर पोहोचला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्ग करावा लागणार आहे. गुरुवारी दुपारी कोयना धरणाने पाणीसाठ्याचा निर्धारित साठा पूर्ण केला.
दुष्काळ जाहीर करण्याची रोहित पवारांची मागणी
मुंबई : पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी राज्यातील ३६ पैकी तब्बल ३१ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे. शेतातील पिके करपत आहेत, विहिरींनी तळ गाठला आहे, बोअरवेल बंद पडत आहेत. जलाशयांमधील पाणीसाठ्यातही मोठी घट होत आहे. एकंदरीतच बळीराजा मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यात दुष्काळ घोषित करून त्याच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
