• Sun. Sep 6th, 2026

Mahad Son Fatally Attacks Mother : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. याचदरम्यान, महाडमध्ये एक संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

भांडी घासताना मुलाचा आईवर जीवघेणा हल्ला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : महाड तालुक्यातील रुपवली सुंभेकोंड येथे पोटच्या मुलानेच आईवर भाजी कापण्याच्या सुरीने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना बुधवारी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात विमल मोतीराम सुंभे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आलं आहे. या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मुलगा राजेंद्र मोतीराम सुंभे (वय 24) याला अटक केली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी विमल सुंभे या आपल्या घरात भांडी घासत होत्या. त्यावेळी त्यांचा मुलगा राजेंद्र हा हातात भाजी कापण्याचा सुरा घेऊन तेथे आला. त्याने अचानक आईवर सुरीने हल्ला करण्यास सुरुवात केली. राजेंद्रने आईच्या शरीरावर सपासप वार केल्यानं विमल या गंभीर जखमी झाल्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. आईवर मुलाने हल्ला केल्याचं लक्षात येताच विमल यांचे पती मोतीराम सुंभे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी राजेंद्रला बाजूला ओढून घेत आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी राजेंद्रने स्वतःवरही सुरीने किरकोळ वार करून घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Maharashtra TimesNagpur Crime : डान्स क्लासला जायचंय, पत्नीचा जेवण बनवण्यास नकार, मद्यधुंद नवऱ्याची सटकली, विवाहितेचा तडफडून अंत

घटनेचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान, राजेंद्रने स्वतःच्या आईवर एवढ्या टोकाचं पाऊल का उचललं? याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून हल्ल्यामागील कारण शोधण्याचं काम सुरू आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विमल सुंभे यांना सुरुवातीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं पुढील उपचारासाठी पनवेल येथे हलविण्यात आलं आहे.

आरोपी मुलाला अटक

या घटनेप्रकरणी आरोपी राजेंद्र सुंभे याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रांत फडतरे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा