• Wed. Jul 29th, 2026

    Dhule News : मायेचा ‘सागर’ अन् विश्वासाचे ‘संस्कार’! अनाथ ‘शिवानी’च्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात; भरलग्नात उपस्थितांचा कंठ दाटला

    Dhule News : मायेचा ‘सागर’ अन् विश्वासाचे ‘संस्कार’! अनाथ ‘शिवानी’च्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात; भरलग्नात उपस्थितांचा कंठ दाटला

    Dhule Shivani and Sagar Wagh Marriage Ceremony Sanskar Institute : लग्न म्हणजे दोन व्यक्तींचं नाही, तर दोन कुटुंबांचं मिलन. पण यापलीकडे जाऊन, लग्न म्हणजे माणुसकीचा आणि विश्वासाचा एक पवित्र सोहळा असू शकतो, हे धुळ्यातल्या एका विवाहानं सिद्ध केलं आहे. संपत्ती, सौंदर्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या पलीकडचं नातं काय असतं, याचा वस्तुपाठ या विवाहानं घालून दिलाय.

    धुळे संस्कार गतिमंद मुलींचं बालगृह शिवानी लग्न सागर वाघ(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अजय गर्दे, धुळे : सनई-चौघड्यांचा मंगलमय सूर, वैदिक मंत्रोच्चारांचा पवित्र घोष आणि साक्षीदार म्हणून उपस्थित असलेल्या असंख्य आप्तेष्टांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू… हे दृश्य आहे धुळ्यातील जोशीवाडा परिसरात झालेल्या एका आगळ्यावेगळ्या विवाहसोहळ्याचं. हा विवाहसोहळा आहे ‘शिवानी’ आणि ‘सागर’ यांचा. जवळपास दशकभरापूर्वी, बालकल्याण समितीच्या आदेशानं ‘श्री संस्कार गतिमंद मुलींच्या बालगृहात’ दाखल झालेली अनाथ ‘बिन्नी’ अर्थात ‘शिवानी’, 22 जुलै बुधवारी रोजी सागर वाघ याच्यासोबत विवाहबंधनात अडकून खऱ्या अर्थाने ‘सनाथ’ झाली आहे.

    एक आत्मविश्वासू तरुणी म्हणून उभी

    एकेकाळी सौम्य बौद्धिक अक्षमतेनं ग्रासलेली आणि अनाथ म्हणून संस्थेत आलेली शिवानी, आता एक आत्मविश्वासू तरुणी म्हणून उभी आहे. संस्थेतील विशेष शिक्षक आणि भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. जीवन पवार यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि वैद्यकीय उपचारांच्या बळावर शिवानीने आपल्या मर्यादांवर यशस्वीपणे मात केली. तिचा बुद्द्यांक आता 80 ते 85च्या दरम्यान असून, ती एक सर्वसामान्य आयुष्य जगू शकते, असा वैद्यकीय निर्वाळा मिळाल्यानंतर तिच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला.
    Maharashtra TimesKolhapur News: कोल्हापुरात माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं; बॉडी गाडीत टाकून थेट मुंबई गाठली, पण भाच्यामुळे डाव फसला!
    शिवानीच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने मायेचा ‘सागर’ आला, तो जोशीवाडा परिसरातील भाजीपालाविक्रेता सागर वाघ याच्या रूपाने. सागर आणि त्याच्या कुटुंबाने शिवानीच्या लग्नासाठी संस्थेकडे प्रस्ताव ठेवला. मात्र, ‘संस्कार’ संस्थेने केवळ भावनेच्या आहारी न जाता, एका जागरूक पालकाची भूमिका अत्यंत चोखपणे बजावली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सागरची आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली. त्याच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून त्याच्या स्वभावाची आणि वर्तणुकीची सखोल माहिती घेतली. सागर शिवानीची जबाबदारी 100 टक्के पेलू शकेल, याची खात्री पटल्यानंतरच आणि बालकल्याण समिती व दिव्यांग सक्षमीकरण विभागाची रीतसर कायदेशीर परवानगी घेतल्यानंतरच या विवाहाला हिरवा कंदील दाखवण्यात आला.

    शाह दाम्पत्याने शिवानीचं कन्यादान केलं

    या विवाहसोहळ्यानं रक्ताच्या नात्यापलीकडच्या नात्यांची नाळ अधिक घट्ट केली. धुळ्यातील प्रतिष्ठित व्यावसायिक भावेश शाह आणि शीतल शाह या दाम्पत्याने शिवानीचं कन्यादान करून एका पित्याचं आणि आईचं पवित्र कर्तव्य पार पाडलं. तर संस्थेचे कर्मचारी चेतनभाऊ मंडोरे यांच्यासह अनेक दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी शिवानीच्या नव्या संसारासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची भेट देऊन तिला आशीर्वाद दिले. स्थळ निवडीपासून ते जेवणावळीपर्यंत, सर्व जबाबदारी ‘संस्कार’ संस्थेनं यशस्वीपणे पार पाडली. संस्थेच्या 16 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीतील हा दुसरा यशस्वी विवाह आहे, जो संस्थेच्या कार्याची आणि निष्ठेची साक्ष देतो.
    Maharashtra TimesWeather Forecast: पावसाच्या तुटीने चिंता वाढलेली असतानाच आनंदाची बातमी; 48 तास अतिवृष्टीचा इशारा, विदर्भासाठी कसा आहे हवामान अंदाज?
    एखाद्या व्यक्तीचा केवळ भूतकाळ आणि त्याच्या शारीरिक किंवा मानसिक मर्यादा न पाहता, त्याच्यातील माणूस म्हणून स्वीकार करणं, हे किती उदात्त असू शकतं, हे सागर आणि त्याच्या कुटुंबाने दाखवून दिलं आहे. तर दुसरीकडे, केवळ आसरा न देता, एका अनाथ मुलीला सक्षम बनवून तिचं सुरक्षित पुनर्वसन करणाऱ्या ‘संस्कार’ संस्थेचा हा प्रयत्न संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श मॉडेल आहे. शिवानी आणि सागर यांचा हा प्रवास, समाजात उपेक्षित राहिलेल्या अनेक जिवांसाठी आशेचा एक नवा किरण ठरेल, यात शंका नाही.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा