• Sun. Sep 13th, 2026

Pune Accident: मॉर्निंग वॉक करताना भरधाव कारची धडक; पुण्यात IT अभियंत्याचा करुण अंत, कारचालक 19 वर्षांचा तरुण

Pune Accident News: आरोपीची कार जप्त करण्यात आली असून, तक्रारीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पुणे: ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्या आयटी अभियंत्याचा भरधाव ‘एसयूव्ही’ कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. पाषाण येथील हनुमान मंदिराजवळच्या नेकलेस गार्डन परिसरात शनिवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्राणांतिक अपघात झाला. कारचालक १९वर्षीय तरुण जखमी झाला असून, त्याच्याविरोधात चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वीरेंद्र राघवेंद्रप्रसाद द्विवेदी (वय ४८, रा. गुलमोहर प्लाझा, विवेकानंद सोसायटी, पाषाण, मूळ रा. रेवा, मध्य प्रदेश) असे अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे भाऊ धिरेंद्र द्विवेदी (वय ४३, रा. मध्य प्रदेश) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, कारचालक इशान विशाल सेठिया (वय १९, रा. वडगाव शेरी) याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra TimesPune Crime : लग्नाला अवघे काही महिने, नवऱ्याचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर, पतीचं कांड पाहून हादरली; पुण्यात नवविवाहेतेचं टोकाचं पाऊलपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीरेंद्र द्विवेदी हे गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास होते. ते हिंजवडी येथील एका नामांकित कंपनीत आयटी अभियंता म्हणून कार्यरत होते. अविवाहित असलेले वीरेंद्र घरात एकटेच असायचे; पण त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे मित्रपरिवार मोठा होता. निरोगी दिनचर्येचा भाग म्हणून ते दररोज सकाळी मित्रांसोबत पाषाण परिसरात फिरायला जात असत. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते एनडीए रस्त्याकडून पाषाणच्या दिशेने हनुमान मंदिराजवळील नेकलेस गार्डन परिसरातून ‘मॉर्निंग वॉक’ करीत होते. नेहमीप्रमाणे पहाटे मित्रांसमवेत गप्पा मारत सुरू झालेला हा ‘मॉर्निंग वॉक’ वीरेंद्र यांच्या आयुष्यातील अखेरचा ठरला. पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. त्यामुळे वीरेंद्र हवेत उडून रस्त्यावर दूर फेकले गेले. गंभीर दुखापत झाल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

Maharashtra TimesPune Crime : मैत्रिणीशी बोलल्याचा राग, पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्याला मध्यरात्री स्कॉर्पिओतून पळवून नेलं, 53 मिनिटात पोलिसांकडून सुखरुप सुटकाअपघातानंतर घाबरलेल्या कारचालकाने आणि वीरेंद्र यांच्या मित्रांनी त्यांना तातडीने जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेले. तेथून पुढील उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अपघातात कारचालक इशान हादेखील जखमी झाला असून, त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या घटनेला कारणीभूत ठरलेला कारचालक इशान सेठिया हा पुणे-मुंबई महामार्गावरील नामांकित ऑक्सफोर्ड महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याचे वडील एका खासगी कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा