• Sun. Sep 13th, 2026

Mumbai Bridge Closure: मुंबईतील चार पादचारी पूल बंद; गणेशोत्सव पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Mumbai Bridge Closure: ३१ ऑगस्टला आयआयटी मुंबईने या चारही पुलांसाठी स्वतंत्र संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : ऐन गणेशोत्सवात माटुंगा आणि मशिद बंदर स्थानकातील प्रवाशांना काही अंशी त्रास सहन करावा लागणार आहे. या स्थानकांतील चार पादचारी पूल बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई’ यांनी केलेल्या संरचनात्मक तपासणीनंतर (स्ट्रक्चरल ऑडिट) हे पूल धोकादायक ठरले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेच्या सूचनेनंतर रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला. मुंबई महापालिका आणि रेल्वे अधिकारी यांच्यातर्फे २७ ऑगस्टला मशीद बंदर येथील भंडारी पादचारी पूल , मशीद बंदर स्थानक पादचारी पूल, भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल आणि गुरू नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल या पुलांची पाहणी केली.

Maharashtra TimesManoj Jarange Chalo Mumbai: मनोज जरांगेंचा पुन्हा मुंबईकडे मोर्चा; मराठा आरक्षणासाठी 19 सप्टेंबरपासून आंदोलन, कुठे-कुठे मुक्काम?संरचनात्मक तपासणीच्या निष्कर्षांनुसार, हे चारही पूल असुरक्षित स्थितीत असल्याचे दिसून आले. पुलांच्या महत्त्वाच्या संरचनात्मक भागांची झीज झाली असून त्यांना गंज लागला आहे. या तपासणी अहवालात हे पूल पादचाऱ्यांच्या रहदारीसाठी त्वरित बंद करावेत आणि पूल पाडून त्याची नव्याने उभारणी करावी, अशी शिफारस करण्यात आली आहे.

आयआयटी मुंबईच्या अहवालातील शिफारशीनुसार संरचनात्मक सुरक्षेच्या चिंता आणि सार्वजनिक सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन पालिकेने पादचारी पूल बंद करण्याची विनंती रेल्वे प्रशासनाला केली. त्यानुसार हे चार पूल तातडीने प्रवासी वापरासाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील सूचना मिळेपर्यंत या पुलांवरून पादचाऱ्यांची वर्दळ हाताळण्यात येणार नाही, असे मध्य रेल्वेने स्पष्ट केले.

गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांच्या आणि पादचाऱ्यांच्या संख्येत होणारी मोठी वाढ लक्षात घेता, हे पूल बंद करणे महत्त्वाचे आहे. उत्सवकाळात रेल्वे स्थानके आणि आसपासच्या परिसरात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने, कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी आणि प्रवासी व सामान्य नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, संरचनात्मकदृष्ट्या असुरक्षित ठरवलेल्या या पादचारी पुलांचा वापर प्रतिबंधित करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने प्रवासी आणि नागरिकांना केले आहे.

Maharashtra TimesGanpati Special Trains: कोकणवासियांसाठी खुशखबर! आजपासून 4 अनारक्षित रेल्वेची सोय, कुठून कुठे धावणार? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रकयेथून प्रवास नको
-मशीद बंदर येथील भंडारी पादचारी पूल
-मशीद बंदर स्थानक पादचारी पूल
-भाऊ दाजी रोडवरील माटुंगा लेव्हल क्रॉसिंग पादचारी पूल
-गुरू नानक हायस्कूलजवळील माटुंगा-धारावी पादचारी पूल

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा