• Wed. Jul 29th, 2026

    Nagpur News : बारमधील ऑर्केस्ट्रा आता बंद ;नवे परवाने नाहीत जुन्यांचेही नूतनीकरण थांबले

    Nagpur News : बारमधील ऑर्केस्ट्रा आता बंद ;नवे परवाने नाहीत जुन्यांचेही नूतनीकरण थांबले

    म.टा.प्रतिनिधी,नागपूर: बार आणि परमिट रूममध्ये चालणाऱ्या ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ अंतर्गत दिले जाणारे प्रत्यक्ष संगीत सादरीकरण अर्थात ऑर्केस्ट्राचे नवे परवाने यापुढे मंजूर केले जाणार नाहीत. तसेच यापूर्वी मंजूर झालेल्या परवान्यांचे नूतनीकरणही बंद करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.

    सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी

    गृह विभागाने सोमवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्षांमधील अश्लील नृत्यांवरील बंदी तसेच तेथील महिलांच्या प्रतिष्ठेच्या संरक्षणासंदर्भातील कायद्यात सुधारणा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    ऑर्केस्ट्रा परवान्यांवर निर्बंध घालण्यात आले

    परिपत्रकानुसार, नृत्य सादरीकरणावरील निर्बंध टाळण्यासाठी काही ठिकाणी प्रत्यक्ष संगीत सादरीकरणाच्या परवान्यांचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. ही प्रवृत्ती रोखण्यासाठी आणि संबंधित कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ऑर्केस्ट्रा परवान्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

    Dhule News : मायेचा ‘सागर’ अन् विश्वासाचे ‘संस्कार’! अनाथ ‘शिवानी’च्या आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात; भरलग्नात उपस्थितांचा कंठ दाटला

    नवे परवाने मिळणार नाहीत

    या संदर्भातील विधेयकास मंत्रिमंडळाने २ जुलै २०२६ रोजी मान्यता दिली होती. विधिमंडळाची मंजुरी आणि राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर २२ जुलै २०२६ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार आता राज्यभरात बारमधील ऑर्केस्ट्रासाठीनवे परवाने मिळणार नाहीत आणि विद्यमान परवान्यांचेही नूतनीकरण केले जाणार नाही.

    सरसकट बंदी घालू नये

    दरम्यान, या निर्णयावर बार व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. ‘अश्लीलता नको, याबाबत दुमत नाही. मात्र, ग्राहकांच्या मनोरंजनासाठी चित्रपटगीतांचे कार्यक्रम करण्यावर सरसकट बंदी घालू नये. अशा निर्णयामुळे अवैध प्रकार वाढण्याची शक्यता आहे’, असे मत नागपूर जिल्हा परमिट रूम असोसिएशनचे अध्यक्ष राजीव जयस्वाल यांनी व्यक्त केले.

    Maharashtra TimesKolhapur News: कोल्हापुरात माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं; बॉडी गाडीत टाकून थेट मुंबई गाठली, पण भाच्यामुळे डाव फसला!

    या नव्या निर्णयात काय आहेत नवे नियम

    . बार आणि परमिट रूममधील ऑर्केस्ट्रासाठी यापुढे नवे परवाने मिळणार नाहीत.

    .आधी मंजूर झालेल्या ऑर्केस्ट्रा परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही.

    .नृत्यावरील निर्बंध टाळण्यासाठी ऑर्केस्ट्रा परवान्यांचा पर्यायी वापर होत असल्याचा शासनाचा निष्कर्ष

    . अश्लील नृत्यप्रकारांना आळा , महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आणि कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

    . गृह विभागाच्या परिपत्रकानुसार राज्यभर निर्णय लागू.

    टीम मटा ऑनलाइन

    लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed