Pune Traffic Changes Update : छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीरामभय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. वाहनचालकांना संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकामार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे.
पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी
छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीरामभय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहे. वाहनचालकांना संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक, मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौकामार्गे इच्छित स्थळी जाता येणार आहे. शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांना स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक रस्ता मार्गे जाता येईल. याशिवाय झाशीची राणी पुतळा चौक, खुडे चौकामार्गे कुंभारवेसकडे जाणारी वाहने छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून मार्गस्थ होतील.
Maharashtra Rain News : बाप्पाच्या आगमनापूर्वी मुंबईत धो-धो पाऊस, 20 जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट, राज्यातला शेतकरी सुखावला; हवामान विभागाचा अंदाज
नीलायम चित्रपटगृहाच्याजवळ पार्किंगची व्यवस्था
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) सारसबाग परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ केंद्रापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक सुरू राहणार असली, तरी पार्किंगसाठी मनाई आहे. भाविकांना मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौकाची डावी बाजू किंवा नीलायम चित्रपटगृहाच्या जवळ वाहने लावता येतील.
ध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल
गणपती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सोमवारी मध्य भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक, मंगला चित्रपटगृहासमोरील रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्तीखरेदीसाठी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन शिवाजी महाराज चौकातून मांजरीकडे जाणारी वाहने गायरान वस्ती रस्ता, विहान सोसायटी, मांजरी रस्त्याने मार्गस्थ होतील. खराडी पुलाकडून येणारी वाहने रेणुकामाता मंदिर, विहान सोसायटी रस्ता, शिवाजी महाराज चौकातून जातील. मुंढवा चौक, शिवाजी महाराज चौक ते कल्याणी बंगला रस्ता, शिवाजी महाराज चौक ते झेड कॉर्नर व केशवनगर परिसरात जड वाहनांना प्रवेश बंदी असेल.
Pune Accident: मॉर्निंग वॉक करताना भरधाव कारची धडक; पुण्यात IT अभियंत्याचा करुण अंत, कारचालक 19 वर्षांचा तरुण
पीएमपी बस मार्गात बदल
शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस मार्गात बदल करण्यात आला आहे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस स. गो. बर्वे चौक, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील, अशी माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली.
कामगार पुतळा ते छत्रपती शिवाजी पुतळा
वीर संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा चौक
टिळक पूल ते भिडे पूल, नदीपात्रातील रस्ता
मंडईतील वाहनतळ
छत्रपती शिवाजी रस्त्यावरील शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक (फक्त डावी बाजू)
