Mumbai-Pune Travel: द्रुतगती महामार्गावर कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण झाल्यानंतर मार्गाच्या दहापदरीकरणाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. आता केंद्र सरकारकडे जुन्या महामार्गाच्या विस्ताराचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे.
१६ पदरी मार्गांवरून वाहतूक होणार
सध्या जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि नव्या द्रुतगती महामार्गांवर एकत्रितपणे दहा पदरी वाहतूक सुरू आहे. दोन्ही महामार्गांचा विस्तार झाल्यानंतर १६ पदरी मार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे भविष्यात वाढणरी वाहतूककोंडी हाताळणं शक्य होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ( MSRDC ) जुन्या मुंबई-पुणे महामार्गाला सहा पदरी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या विस्तारासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. प्रकल्पाचा अंतिम आराखडा कसा असेल हे अहवाल तयार झाल्यानंतरचं समोर येईल.
Mumbai-Pune Railway: मुंबई-पुणे रेल्वेमार्गासाठी नवा प्रकल्प, कर्जत ते लोणावळादरम्यान आपत्कालीन रस्ता उभारणार; मध्य रेल्वेचा निर्णय
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या विस्तारासाठी प्रस्ताव केंद्र सरकारडे पाठवला आहे. या प्रकल्पासाठी ७,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. काम सुरू झाल्यावर तीन वर्षांत या मार्गाचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. खंडाळा, लोणावळा, खोपोलीसाठी बायपास मार्ग, कळंबोली ते शिळफाटा आठपदरी रस्ता, इंटरचेंज आणि तळेगाव, खोपोली आणि खालापूरसारख्या ठिकाणांवर तब्बल १३ उड्डाणपुलांचा या प्रकल्पात समावेश असेल.
जुना मुंबई-पुणे महामार्ग इंग्रजांच्या काळात १९व्या शतकात सुरू झाला होता. पूर्वी पेशव्याचं केंद्र असलेल्या पुणे ते मुंबई (त्या काळातील ‘बॉम्बे’)या दोन्ही शहरांदरम्यान प्रवास करताना काही दिवस लागायचे. डोंगर पार करून, नद्या पार करून अंतर पार करावं लागत होतं. हाच राष्ट्रीय महामार्ग (NH-48) आता मुंबईला पुण्याशी आणि पुढे बंगळुरू ते चेन्नईपर्यंत जोडतो.
द्रुतगती महामार्गाची ४ वर्षांत क्षमता वाढणार
दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचंही रुंदीकरण केलं जाणार आहे. महमार्गाला सहा पदरी मार्गावरून १० पदरी करण्याचं कामही ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतलं आहे. या प्रकल्पासाठी १४,००० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी या मार्गाचं रुंदीकरण सुरू करून पुढील चार वर्षांत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. २०३० पर्यंत जुना आणि नवीन अशा दोन्ही महामार्गांचं काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढवण्यासाठी १ मे रोजी महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन केलं. आता या मार्गाला कनेक्टिंग लिंक असं नाव दिलं गेलं आहे. तब्बल ६,७९० कोटी रुपये खर्च करून हा दोन बोगदे आणि एक केबल-स्टेड पूल असलेला मार्ग तयार करण्यात आला आहे.
Maharashtra Weather: जुलैअखेरीस महाराष्ट्रात कोसळधारा, ऑगस्ट येताच पावसाचा जोर ओसरणार; हवामान विभागाचा अंदाज
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, पुणे रिंग रोड, पुणे-नाशिक द्रुतगती महामार्ग आणि पुणे-संभाजीनगर महामार्ग या प्रस्तावित प्रकल्पांमुळे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या एका अधिकाऱ्याने ‘इंडिया टुडे’शी बोलताना दिली. पुढील ५० वर्षांत या मार्गांवर अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याची योजना आहे,
