• Thu. Jun 18th, 2026

    Thane News: चिन्मयने ‘कोमल’ बनून तरुणीला इन्स्टावर मेसेज केला, जाब विचारताच भडकला; तिच्या १९ वर्षीय मित्राला संपवलं!

    Thane News: चिन्मयने ‘कोमल’ बनून तरुणीला इन्स्टावर मेसेज केला, जाब विचारताच भडकला; तिच्या १९ वर्षीय मित्राला संपवलं!

    Thane Crime: सोशल मीडियावरून झालेल्या वादाने टोक गाठलं आणि ठाण्यातील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे.

    चिन्मयने ‘कोमल’ बनून तरुणीला इन्स्टावर मेसेज केला, जाब विचारताच भडकला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: शहरात बुधवारी दोन हत्या घडल्याने खळबळ उडाली आहे. घोडबंदर रोड परिसरात दुपारी साहिल पांचाळ (१९) या तरुणाची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, रात्री नौपाडा परिसरात तलावपाळी येथे पदपथावर एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील तुळशीधाम परिसरात साहिल राहत होता. त्याच्या एका मैत्रिणीला चिन्मय डोळस नावाच्या तरुणाने इन्स्टाग्रामवर कोमल नावाने फेक अकाऊंट तयार करून अश्लील मेसेज केला. सदर मैत्रिणीने कोणतीही स्टोरी टाकली की आरोपी चिन्मय हा फेक अकाऊंटवरून अश्लील कमेंट करत असत. आपल्या मैत्रिणीसोबत होत असलेल्या या प्रकारानंतर साहिल पांचाळ याने आरोपी चिन्मयला जाब विचारला. त्यानंतर भडकलेल्या चिन्मयने त्याला बुधवारी दुपारी ३.३० वाजता घोडबंदर रस्त्यावर बोलावून घेतले. तसंच चिन्मयने त्याचा भाऊ आणि अन्य एका आरोपीलाही घटनास्थळी बोलावले. त्यातील एका आरोपीने चाकूने साहिल याच्यावर वार करत त्याची हत्या केली. तर, साहिल याचा १७ वर्षांच्या भावावर चाकूने हल्ला केला.

    या हल्ल्यात हा तरुण जखमी झाला आहे. याबाबतची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींचे वय अनुक्रमे १९, २०, २३ आहेत. या हत्येला समाजमाध्यमावरील वादाची किनार असल्याची माहिती समोर आली आहे.

    दुसरीकडे, या घटनेनंतर ठाण्यातील नौपाड्यातील तलावपाळी परिसरात पदपथावर रात्री ९ वाजता मुबारक फरीद शेख उर्फ मुन्ना याची डोक्यात दगड हत्या करण्यात आली. मुन्ना हा बिगारी काम करत होता. आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. मुन्ना याने चार दिवसापूर्वी आरोपीचे तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. याच रागातून ही हत्या घडल्याची बाब प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याबे सांगितलं या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा