Navi Mumbai Airport: शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या २० फुटी पुतळ्याचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विमानतळाच्या टर्मिनल-१ येथे हा २० फुटी ब्राँझ पुतळा स्थापित करण्यात आला आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय नेतृत्वाचा, शौर्याचा आणि दूरदृष्टीचा गौरव करणारे हा पुतळा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आला आहे. फक्त आठ महिन्यांत हा पुतळा तयार करण्यात आला आहे. या विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला यातून एक ऊर्जा मिळत राहील,’ अशा विश्वास ही फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.
Shivarajyabhishek Din 2026: महाराष्ट्राच्या अस्मितेचा जागर; शिवराज्याभिषेक दिनी नवी मुंबई विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रायव्हेट लिमिटेड यांच्या पुढाकारातून साकारण्यात आलेला हा ब्राँझ धातूतील अर्धपुतळा असून तो आठ फूट उंच चौथऱ्यावर स्थापित करण्यात आला आहे. नवी मुंबईतील शिल्पकार नितीन रोहिदास गोरडे यांनी या पुतळ्याची उभारणी केली आहे. या वेळी वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, ‘सिडको’चे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापक व इतर अधिकारी आदी उपस्थित होते.
Eknath Shinde: फडणवीस उपस्थित, पण शिंदेंना जाणीवपूर्वक डावललं? महायुतीतील बेबनाव उघड, सरकारी कार्यक्रमात काय घडलं?
विमानतळावरील कार्यक्रमास एकनाथ शिंदे यांची अनुपस्थिती
ठाण्याचे पालकमंत्री असलेले; तसेच ‘सिडको’ ज्यांच्या अख्यत्यारित येते त्या नगरविकास खात्याचे मंत्री असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या महत्त्वाच्या सोहळ्याला उपस्थित नसल्याने तर्कवितर्कांना उधाण आले. विधान परिषद निवडणूक महायुती एकत्रितपणे लढलेली असताना या प्रकारामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील बेबनाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आदी उपस्थित होते. मात्र, शिंदे यांच्या अनुपस्थितीची चर्चा उपस्थितांमध्येही रंगली होती.
