• Wed. Jun 10th, 2026

    Jalna News : वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली, बळीराजाचं काळीज तुटलं, संपूर्ण गाव एकवटलं, सर्जा-राजाचं यशस्वी रेस्क्यू

    Jalna News : वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली, बळीराजाचं काळीज तुटलं, संपूर्ण गाव एकवटलं, सर्जा-राजाचं यशस्वी रेस्क्यू

    जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली. शेतात काम करत असताना वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली. यावेळी बैलजोडीला वाचवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले. विशेष म्हणजे आमदार नारायण कुचे हे देखील घटनास्थळी दाखल झाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    योगेश काकफळे, जालना : शेतकरी आणि बैलाचं एक अनोखं भावनिक नातं असतं. बैल शेतातील कामांमध्ये बळीराजाला मदत करतात. बैल हा शेतकऱ्यांच्या सुख-दु:खातला जोडीदार असतो. अनेक गोष्टी ज्या बळीराजा करु शकत नाही त्या एक बैलजोडी करुन दाखवतात. शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतात. शेतकरी शेतात अन्नधान्य पिकवतात. त्यामुळे संपूर्ण जग आज पोट भरत आहे. शेतकऱ्याच्या वैयक्तिक जडणघडणीत बैलांचं मोठं योगदान असतं. त्यामुळे बैल आणि शेतकऱ्याच्या नात्यात एक भावनिक ओलावा असतो. हाच भावनिक ओलावा जालना जिल्ह्यातील एका गावात बघायला मिळाला. शेतात काम करत असताना बैलजोडी ही 70 फूट खोल असणाऱ्या विहिरीत कोसळते. यामुळे या बैलांच्या मालकाची खूप तारांबळ उडते. या शेतकऱ्याला मदतीसाठी संपूर्ण गाव जमा होतं. या घटनेची सध्या पंचक्रोशीत चांगलीच चर्चा होत आहे.

    जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने काही काळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकरी ज्ञानेश्वर जूंबड हे आपल्या शेतात बैलजोडीच्या साहाय्याने मशागतीचे काम करत होते. पण अचानक त्यांची बैलजोडी सुमारे 70 फूट खोल विहिरीत कोसळली. ही घटना घडताच शेतकऱ्यासह परिसरातील नागरिकांची धावपळ उडाली. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. विहीर खोल असल्याने आणि बैलजोडीला कोणतीही गंभीर दुखापत होऊ नये यासाठी सर्वांनी सावधगिरी बाळगत बचावकार्य सुरू केले. लांना सुरक्षित बाहेर काढणे हे मोठे आव्हान ठरत होते. मात्र ग्रामस्थांनी हार न मानता एकजुटीने प्रयत्न सुरू ठेवले.

    दोऱ्यांच्या सहाय्याने तसेच उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून बैलजोडीला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर अखेर ग्रामस्थांना बैलजोडीला सुखरूप विहिरीबाहेर काढण्यात यश आले. बैल सुरक्षित बाहेर येताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि आनंद व्यक्त केला.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार नारायण कुचे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांसोबत बचावकार्यात सहभाग घेत आवश्यक मदत केली. त्यांच्या उपस्थितीमुळे बचावकार्याला अधिक गती मिळाली. संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी दाखवलेली तत्परता चर्चेला कारण ठरली आहे.

    शेतकऱ्यांसाठी बैल हे केवळ जनावरे नसून त्यांच्या कुटुंबाचा आणि शेती व्यवसायाचा महत्त्वाचा आधार असतात. शेतीची अनेक कामे अजूनही बैलांच्या साहाय्याने केली जात असल्याने त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे बैलजोडी विहिरीत पडल्याची घटना समजताच शेतकरी ज्ञानेश्वर जूंबड यांच्यासह संपूर्ण गाव चिंतेत पडले होते. मात्र सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बैलांचे प्राण वाचल्याने गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

    या घटनेतून गावातील एकोपा, सामाजिक बांधिलकी आणि संकटसमयी धावून जाण्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. एखाद्या संकटाच्या प्रसंगी गावकरी एकत्र आल्यास कोणतेही कठीण काम शक्य होते, याचे जिवंत उदाहरण उज्जैनपुरी येथे पाहायला मिळाले. ग्रामस्थांच्या धाडसामुळे आणि सामूहिक प्रयत्नांमुळे एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान टळले असून या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा