जामिनावर सुटताच फटाक्यांची आतषबाजी करणं एका तथाकथित भाईला चांगलंच महागात पडलं आहे. पोलिसांनी या भाईला जन्माची अद्दल घडवली आहे. अखेर या भाईने पोलिसांची माफी मागत इतरांना देखील असं न करण्याचं आवाहन केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अहिल्यानगर : गुटखा विक्रीच्या गुन्ह्यात कारागृहाची हवा खाल्ल्यानंतर जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने कारागृहाच्या बाहेर येताच फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. एवढ्यावरच न थांबता या जल्लोषाचा व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर टाकत भाईगिरीचा आव आणला. मात्र, ही स्टाईल पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही. व्हिडिओ व्हायरल होताच भिंगार कॅम्प पोलिसांनी थेट आरोपीच्या मुसक्या आवळत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रीलच्या नादात कायदा हातात घेतलात तर कारवाई अटळ, असा इशाराच या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.
सद्दाम हुसेन पठाण असे पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागलेल्या आरोपीचे नाव आहे. गुटखा विक्रीच्या आरोपाखाली पठाण याच्यावर कारवाई झाली होती. या प्रकरणात त्याला अहिल्यानगर कारागृहात शिक्षा झाली होती. त्यानंतर जामीन मिळाल्याने तो कारागृहातून बाहेर आला. मात्र, बाहेर पडताच त्याच्या समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष सुरू केला. आरोपीनेही या जल्लोषाचा व्हिडिओ तयार करून तो समाजमाध्यमांवर प्रसारित केला.
भिंगार कॅम्प पोलिसांकडून व्हिडीओची गंभीर दखल
व्हिडिओमध्ये कारागृहातून बाहेर आल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, जल्लोष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे प्रदर्शन करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. काही वेळातच हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला. व्हिडिओ भिंगार कॅम्प पोलिसांच्या हाती लागताच पोलिसांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली.
Pune Crime : 500 सीसीटीव्ही तपासले, दिवसरात्र तपास, अखेर 27 तोळे सोन्याचे दागिने जप्त, सराईत चोरटे जेरबंदकॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात आणि त्यांच्या पथकाने व्हिडिओची माहिती घेत आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी कोणताही विलंब न करता आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
रीलच्या नादात भाईगिरी दाखवणे भोवले
गुन्ह्यात कारवाई झाल्यानंतरही त्याचे उदात्तीकरण करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. गुन्हा करून त्याची दहशत निर्माण करणारे किंवा पोलीस कारवाईला आव्हान देणारे चित्र उभे करणारे व्हिडिओ तयार करून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आता चांगलेच महागात पडणार आहे.
Thane News : प्रताप सरनाईक यांचा पक्षातील नेत्यालाच घरचा आहेर, ठाण्यातील रखडलेल्या ‘झोपू’ प्रकल्पांवरुन साधला निशाणापोलिसांनी कारवाई केल्यानंतर सद्दाम हुसेन पठाण याने आपली चूक झाल्याचे मान्य केले आहे. अशा प्रकारे फटाके फोडून जल्लोष करू नये, भाईगिरीचे व्हिडिओ तयार करू नयेत आणि समाजमाध्यमांवर अशा प्रकारचे चित्रण प्रसारित करू नये, असे आवाहन त्याने केले.
Mumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैद
पोलिसांचा देखील स्पष्ट इशारा
समाजमाध्यमांवर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे, दहशत निर्माण करणारे किंवा कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा भिंगार कॅम्प पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे कारागृहातून जामिनावर बाहेर पडताच फटाक्यांची आतषबाजी करून भाईगिरीचा व्हिडिओ बनविणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रीलमधून थेट पोलीस ठाण्यात आणल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा