• Tue. Jun 9th, 2026
    Akola News : माणुसकी हरली! धड बसता येईना अन् चालताही येईना, सोबत लहान लेकरू, आजारी नवऱ्याला पाठीवर घेत बायकोची भटकंती; नेमकं काय घडलं? Video

    Akola Government Hospital Video : अकोला जिल्ह्यात चक्का शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथील एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

    अकोला पत्नीने आजारी पतीला पाठीवर उचललं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रियंका जाधव, अकोला : अकोला येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (जीएमसी) रुग्णांच्या सोयीसाठी असलेल्या रुग्णवाहिकांची कमतरता असल्यानं रुग्णांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. नुकत्याच एका आदिवासी महिलेनं आपल्या आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात भटकंती केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

    नेमकी घटना काय?

    या महिलेनं आपल्या पतीला उपचारासाठी जीएमसीत आणलं होतं. तिचा पती खूप आजारी असुन त्याला चालताही येत नव्हतं. महिला आपल्या पतीला रुग्णालयात घेऊन आली, परंतु तिला रुग्णालयाच्या परिसरात रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे ती आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात उपचारासाठी भटकत राहिली. या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयात फिरताना दिसत आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर रुग्णालयाबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
    Maharashtra TimesJalna News : वखरासह बैलजोडी विहिरीत कोसळली, बळीराजाचं काळीज तुटलं, संपूर्ण गाव एकवटलं, सर्जा-राजाचं यशस्वी रेस्क्यू

    रुग्णालय प्रशासनाचा निष्काळजीपणा

    रुग्णालयात रुग्णवाहिकांची कमतरता, सुरक्षारक्षक व मदतीनीस असताना सुद्धा असे प्रकार घडत आहेत. यावर जीएमसी प्रशासन या घटनेवर काय कारवाई करते? असा प्रश्न रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये निर्माण झाला आहे. ही घटना जीएमसीच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं प्रतीक आहे. रुग्णालयात रुग्णांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. जर रुग्णांना योग्य उपचार मिळाले नाहीत, तर त्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. शासन आणि प्रशासनानं या घटनेची गंभीर दखल घेऊन रुग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, असं नातेवाईकांनी म्हटलं आहे.

    व्हायरल व्हिडिओमध्ये ब्रेन स्ट्रोक आलेल्या पतीला उपचारासाठी घेऊन एक महिला अकोला मेडिकल कॉलेजमध्ये आली होती. मात्र, ती महिला स्ट्रेचर, व्हीलचेअर अभावी पतीला अक्षरशः पाठीवर घेऊन रुग्णालयाच्या विविध विभागांत भटकताना दिसते. ही महिला एका हाताने लहान मुलाला सांभाळत होती, पोटाला बॅग लटकवलेली होती आणि दुसऱ्या बाजूला गंभीर अवस्थेतील पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावपळ करत होती.

    कर्मचाऱ्यांची क्रूर असंवेदनशीलता

    धक्कादायक बाब म्हणजे, त्याठिकाणी सुरक्षारक्षक आणि वॉर्डातील कर्मचारी उपस्थित होते. ते हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यानं पाहत होते. मात्र, महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही. यामधूनच अकोला मेडिकल कॉलेज प्रशासनाची असंवेदनशीलता उघड होत आहे. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. कदाचित शासनापर्यंत सुद्धा पोहोचला असेल, मात्र, शासन या व्हिडिओला किती गंभीरतेनं घेतं आणि संबंधितांवर कारवाई करतं की शासनही मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्याप्रमाणे असंवेदनशीलता दाखवतं, हे पाहणं महत्वाचं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा