• Fri. Sep 11th, 2026

Pune Crime : 500 सीसीटीव्ही तपासले, दिवसरात्र तपास, अखेर 27 तोळे सोन्याचे दागिने जप्त, सराईत चोरटे जेरबंद

पोलिसांनी सराईत चोरट्यांना जेरबंद केलं आहे. हे आरोपी चेन चोरी करायचे. चेन चोरीच्या घटना वाढल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी युद्ध पातळीवर कारवाईला सुरुवात केली. पोलिसांना या कारवाईत मोठं यश आलं आहे. पोलिसांनी आरोपींकडून 27 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी- चिंचवड : शहरातील वाढत्या चेन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मकोकासह पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सराईत इराणी चेन चोराला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल 27 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, ज्याची किंमत 34 लाख 33 हजार रुपये, जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत चेन चोरीचे तब्बल 15 गुन्हे उघडकीस आले आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरातील चेन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून आरोपींना निष्पन्न करण्याचे आदेश गुन्हे शाखेतील पथकांना दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला.

पोलिसांनी आरोपींना कसं शोधलं?

पथकातील अधिकारी आणि अंमलदारांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चेन चोरीची घटना घडल्यानंतर घटनास्थळी तात्काळ भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढत त्यांची ओळख पटविण्याचे काम करण्यात आले.

Maharashtra TimesMumbai Local : मुंब्रा-दिवा वळणावर महिला थेट लोकल ट्रेनमधून खाली पडली, घटना कॅमेऱ्यात कैददरम्यान, निगडी पोलीस ठाणे गुन्ह्यातील चेन चोरीच्या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सुमारे 400 ते 500 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे मुंबईपर्यंत आरोपींचा माग काढण्यात आला. या गुन्ह्यातील फिदा इराणी आणि आदित्य मनलोर यांना निष्पन्न करण्यात आले.

त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फिदा इराणी याच्याबाबत पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी 5 सप्टेंबर 2026 रोजी देहूरोड परिसरातून फिदा इराणी याला अटक केली. त्याच्यासोबत त्याचा साथीदार मुकेश नेटके यालाही अटक करण्यात आली.

Maharashtra TimesThane News : प्रताप सरनाईक यांचा पक्षातील नेत्यालाच घरचा आहेर, ठाण्यातील रखडलेल्या ‘झोपू’ प्रकल्पांवरुन साधला निशाणा

15 चेन चोरीचे गुन्हे उघड

पोलिसांच्या तपासात फिदा इराणी याने त्याचा साथीदार आदित्य मनलोर, तसेच काशिम जाफर हुसेन यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी चेन चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 13 ठिकाणी, तर पुणे शहराच्या हद्दीत 2 ठिकाणी, अशा एकूण 15 चेन चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला.

आरोपींकडून लाखोंचे सोने जप्त

या गुन्ह्यांच्या तपासातून 34 लाख 33 हजार रुपये किमतीचे 27 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. फिदा इराणी याच्याविरुद्ध यापूर्वी खुनाचा प्रयत्न तसेच चेन चोरीसारखे गंभीर 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर आरोपी मुकेश नेटके याच्याविरुद्ध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल आहे.

इतर दोन आरोपीही पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणातील तालीब बाबा इराणी (वय 31) आणि अली अब्बास शौकत इराणी (वय 28) हे देखील चेन चोरीच्या प्रत्येकी पाच गुन्ह्यांत पाहिजे असल्याचे तपासात समोर आले. या दोघांना 8 सप्टेंबर 2026 रोजी ताब्यात घेण्यात आले असून, पुढील कारवाईसाठी त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Maharashtra TimesEknath Shinde : ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदे यांचं अस्खलित इंग्रजीत भाषण, नेमकं काय म्हणाले?दरम्यान, आरोपी आदित्य मनलोर हा सध्या रावेत पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्याच्याकडे अधिक तपासासाठी ताबा घेण्यात येणार आहे.

2026 मध्ये 32 चेन चोरीचे गुन्हे उघड

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने 2026 मध्ये आतापर्यंत एकूण 32 चेन चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवायांमध्ये तब्बल 50 लाख 63 हजार रुपये किमतीचे 41 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

या कारवाईमुळे शहरातील चेन चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला मोठे यश मिळाले आहे. आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.