• Sun. Jun 7th, 2026
    Maratha Reservation : अखेर लढ्याला यश आलं! मनोज जरांगे इम्पॅक्ट, मराठा समाजासाठी मोठे निर्णय; वाचा संपूर्ण शासन निर्णय

    Maratha Reservation Chief Minister Devendra Fadnavis Decision : शासन निर्णयांव्यतिरिक्त ज्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा इतर मागास प्रवर्गास लागू करण्यात आल्या असतील, अथवा भविष्यात लागू करण्यात येतील, त्या सर्व शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा पुढील आदेशापर्यंत मराठा समाजास आपोआप लागू होतील. या शासन निर्णयातील तरतुदी चालू शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) लागू होणार आहेत, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

    देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षण निर्णय(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्ग प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधांचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने शुक्रवारी जाहीर केला. यात प्रामुख्याने आठ निर्णयांचा समावेश आहे.

    मोटार वाहनचालक व वाहक प्रशिक्षण योजना

    सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसृत केला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी नुकतेच उपोषण केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांची समजूत घालून हे उपोषण स्थगित केले. यावेळी सरकारने जरांगे यांना विविध आश्वासने दिली. या पार्श्वभूमीवर हा निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयानुसार राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेली शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही लागू करण्यात येणार आहे. याशिवाय या विद्यार्थ्यांसाठी मोटार वाहनचालक व वाहक प्रशिक्षण योजना नियोजन विभाग सारथी संस्थेमार्फत राबवण्यात येणार आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली शिष्यवृत्ती योजनाही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू करण्यात येणार आहे.
    Maharashtra TimesST Bus: एसटी स्थानकं, बस, विश्रांतीगृहे होणार अधिक स्वच्छ, दर चार तासांनी साफ-सफाईची व्यवस्था; कधीपासून सुरू होणार?

    १६ बाबींची प्रतिपूर्ती योजना

    शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पीपीपी योजनेअंतर्गत उपलब्ध जागांवर, तसेच खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना सुरू आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना शुल्कमाफी दिली जाते. ही योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठीही आता लागू करण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विकास विभागाकडून ती राबवण्यात येणार आहे. अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू असलेल्या इतर १६ बाबींची प्रतिपूर्ती योजना म्हणजे शुल्कमाफी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना देण्याची कार्यवाही संबंधित विभागाने करावी. राज्यातील रहिवासी असणाऱ्या व परराज्यात अनुदानित व विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या ओबीसी उमेदवारांसाठीची योजनाही या विद्यार्थ्यांना लागू करण्याची कार्यवाही संबंधित विभागाने करावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत शिक्षण, परीक्षा शुल्कांची प्रतिपूर्ती, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, काही प्रकरणांत निर्वाह भत्ता दिला जातो.

    मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र

    ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधांसाठी आता मराठा समाजातील विद्यार्थीही पात्र ठरणार आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रिया (सीएपी) पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश नियंत्रण समितीने मान्यता दिलेल्या संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक सवलती लागू केल्या जाणार आहेत. दरम्यान, योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासकीय विभागांनी मराठा समाजातील पात्र लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम प्रज्ञा विभागास सूचना द्याव्यात, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आलेलं आहे.
    Maharashtra TimesJalgaon Accident : चौघं लस्सी प्यायला निघाले, वाटेतच काळाची झडप, भरधाव वाहनाची बाईकला धडक; लहान लेकरासह चौघांचा हृदयद्रावक अंत

    हे आठ लाभ मिळणार…

    शालांत परीक्षोत्तर शिष्यवृत्ती योजना

    मोटार वाहनचालक व वाहक प्रशिक्षण योजना

    प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

    व्यावसायिक प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना

    इतर १६ बाबींची प्रतिपूर्ती योजना

    परराज्यांतील व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश योजना

    इतर शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा

    संस्थास्तरावर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लागू सवलती

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा