MSRTC Cleanliness Drive: जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एसटीच्या स्वच्छता मोहीमेची घोषणा केली. परळ एसटी बस स्थानकात शुक्रवारी उपक्रमाची सुरूवात झाली.
जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने राज्यव्यापी अत्याधुनिक स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ मुंबईतील परळ बसस्थानक येथे करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील बसस्थानके, एसटी बस, चालक-वाहक विश्रांतीगृहे आणि प्रसाधनगृहे अधिक स्वच्छ, सुंदर व प्रवासी-अनुकूल बनविण्याचा महामंडळाचा संकल्प असल्याचे मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. यावेळी परळ बसस्थानक येथे आयोजित कार्यक्रमात स्वच्छता मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आधुनिक यंत्रसामग्रीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत राज्यभरातील प्रमुख बसस्थानके आणि त्यांचा परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांच्या साहाय्याने नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे.
ST Bus: १०० टक्के एसटी बसेस ‘इलेक्ट्रिक’ करणार, मुख्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; प्रवास आरामदायी आणि प्रदूषणमुक्त होणार
चार्जिंग स्टेशनचे जाळे
एसटी महामंडळाने आपल्या सर्व २५१ आगारांमध्ये ई-बससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळे उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित नऊ चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचे भूमिपूजन मंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, विभागीय नियंत्रक, कर्मचारी प्रतिनिधी तसेच विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सरनाईक यांनी परळ बसस्थानक परिसर, प्रवासी प्रतीक्षागृह, प्रसाधनगृहे आणि इतर सुविधांची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या.
‘बेस्ट आराखडा सादर करा’
‘बेस्टच्या सर्वांगीण पुनरुज्जीवनासाठी डेपो विकास, कर्मचारी निवासस्थानांची उभारणी, सार्वजनिक सुविधांची निर्मिती आणि दीर्घकालीन आर्थिक स्वावलंबन यांचा समावेश असलेला महत्त्वाकांक्षी आराखडा तयार करण्यात येत आहे. या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, मुंबई शहराच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचे, कर्मचाऱ्यांचे हित आणि शहराचा दीर्घकालीन विकास या तीन प्रमुख बाबी केंद्रस्थानी ठेवून बेस्टच्या आराखडा सरकारकडे सादर करावा’, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिले.
ST Bus: एसटीची स्वच्छतागृहे आता मोफत; ७८व्या वर्धापनदिनानिमित्त महामंडळाचा निर्णय; प्रवास स्वच्छ व सुखद होणार
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन बेस्ट उपक्रमाच्या विविध बस आगारांच्या आधुनिकीकरणासंदर्भात आयोजित बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सूचना केल्या. मुंबई महापालिकेच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, बेस्ट समितीच्या अध्यक्ष तृष्णा विश्वासराव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, ऊर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव ऊर्जा आभा शुक्ला, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, महापालिका आयुक्त अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.
