• Sun. Jun 7th, 2026

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! पश्चिम, हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक; 5 तास चालणार दुरुस्तीकामे, कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! पश्चिम, हार्बर रेल्वेवर रविवारी ब्लॉक; 5 तास चालणार दुरुस्तीकामे, कोणत्या लोकल रद्द? पाहा वेळापत्रक

    Mumbai Local Mega Block Update: या वेळेत रुळांसह सिग्नलची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

    मुंबई लोकल ट्रेन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान उद्या, रविवारी मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान शनिवारी मध्यरात्रीनंतर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    हार्बर रेल्वेे
    स्थानक : सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे
    मार्ग : अप आणि डाऊन
    वेळ : सकाळी ११.४० ते दुपारी ४.४०
    परिणाम : ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते वाशी बेलापूर/पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. पनवेल ते कुर्लादरम्यान फलाट क्रमांक ८ वरून २० मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. यामुळे हार्बरवरील लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    Maharashtra TimesMaratha Reservation : अखेर लढ्याला यश आलं! मनोज जरांगे इम्पॅक्ट, मराठा समाजासाठी मोठे निर्णय; वाचा संपूर्ण शासन निर्णय
    मुख्य मार्ग (मध्य रेल्वे)
    स्थानक : सीएसएमटी ते विद्याविहार
    मार्ग : अप आणि डाऊन धीमा
    वेळ : शनिवारी मध्यरात्रीनंतर १२.०५ ते रविवारी पहाटे ५.०५
    परिणाम : ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. जलद लोकल परळ, माटुंगा, शीव स्थानकात थांबणार आहेत. देखभालीच्या कामांमुळे रात्री उशिरा आणि पहाटे लवकर धावणाऱ्या लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

    Maharashtra TimesAmol Mitkari: सुनेत्रा पवारांची राज्यसभा सीट नवनीत राणांना मिळण्याची चर्चा; हा अजितदादांचा दरारा असणारा पक्ष, मिटकरींची अस्वस्थता उघड
    पश्चिम रेल्वे
    स्थानक : चर्चगेट ते मुंबई सेंट्रल
    मार्ग : अप आणि डाऊन धीमा
    वेळ : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
    परिणाम : ब्लॉकवेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे. चर्चगेटला जाणाऱ्या काही जलद लोकल दादर, वांद्रेपर्यंतच चालवण्यात येणार आहेत. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून, काही विलंबाने धावणार आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा