Emotional Story : दहा वर्षांपूर्वी माझी २० वर्षांची बहीण अनुश्री हिने माझ्याच कुशीतच प्राण सोडले. जेव्हा माझ्या पत्नीच्या पोटी मुलगी जन्माला आली, तेव्हा आई आनंदाने मिठी मारत मला म्हणाली, ‘अखेर ती परत आली.’
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : “दहा वर्षांपूर्वी, माझी २० वर्षांची बहीण अनुश्री हिने माझ्याच कुशीतच प्राण सोडले. त्यामुळे, जेव्हा डॉक्टरांनी नुकतंच आम्हाला सांगितलं, की माझ्या पत्नीच्या पोटी मुलगी जन्माला येणार आहे, तेव्हा मी आणि माझ्या आईने एकमेकांना मिठी मारली आणि आम्ही रडलो. माझ्याकडे पाहत आई हळूच म्हणाली, ‘अखेर ती परत आली.’ अशा शब्दात नागालँडमधील दिमापूर येथे राहणाऱ्या अरिंजय जैन याने आपली हळवी आठवण सांगितली.
दहा वर्षांपूर्वीची बहिणीची आठवण
“त्यावेळी वीस वर्षांची असलेली माझी बहीण अनुश्री – जिला आम्ही घरी ‘शुभी’ म्हणायचो – ती अतिशय उत्साही आणि आनंदी स्वभावाची होती. ती हुशार आणि धाडसी होती; कुटुंबातील प्रत्येकाची ती लाडकी होती. ५ ऑक्टोबर २०१६ रोजी तिने आपल्या जिवलग मैत्रिणीसोबत एक कॅफे सुरू केला. उद्घाटनाच्या आदली रात्र मला अजूनही आठवते. तिने ती जागा खूप सुंदर सजवली होती, पण जेव्हा मी मेनू कार्ड मागितले, तेव्हा ती म्हणाली, ‘मेनू? अरेरे, तो बनवायचाच राहून गेला!’ पण अवघ्या एका महिन्यानंतर, ६ नोव्हेंबर २०१६ रोजी, सर्व काही बदलून गेले.” असं नागालँडमधील दिमापूरचा रहिवासी असलेल्या अरिंजय जैन याने सांगितलं.
“डेंग्यूमुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले. ती बरी होईल असे आम्हाला वाटले होते, पण अचानक तिची प्रकृती खालावली आणि आम्ही काही करण्यापूर्वीच ती कायमची आम्हाला सोडून गेली.” अशी दुखरी आठवण अरिंजयने सांगितली.
कुटुंब नैराश्यात, भाऊ कोलमडला
“आमच्या घरात दुःखाचे सावट पसरले. माझी आई तीव्र नैराश्यात गेली आणि मी अस्वस्थतेशी झुंजत होतो. सणासुदीच्या काळात आम्हाला घरी राहणे कठीण जायचे – तिची खूप आठवण यायची – म्हणून त्या दुःखापासून दूर जाण्यासाठी आम्ही प्रवासाला निघायचो. लोक त्याबद्दल आमच्यावर टीका करायचे, पण त्यांना आमच्या वेदनांची कल्पना नव्हती. आम्ही तिचे नाव घेणेही बंद केले होते; कारण ते खूप वेदनादायी होते.”
“२०१७ मध्ये नैनासोबत माझे लग्न झाले, अरेंज्ड मॅरेज. ती आमच्या कुटुंबाची मैत्रीण होती आणि शुभीला ती खूप आवडायची. नैनाने आम्हाला खंबीर साथ दिली आणि आमच्या घरात पुन्हा आनंद आणला. या वर्षी जेव्हा आम्हाला समजले की आम्ही आई-बाबा होणार आहोत, तेव्हा आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. १६ ऑगस्ट २०२६ रोजी नैनाने आमच्या मुलीला, नायराला, जन्म दिला.” असं अरिंजय सांगतो.
“गेली दहा वर्षे ज्यांच्या चेहऱ्यावर हास्य नव्हते, ते माझे आई-वडील पूर्णपणे बदलले. याआधी माझे वडील कधीच सहजपणे माझ्या खोलीत येत नसत. पण आता, दररोज सकाळी ७:३० वाजता ते आपल्या नातीसोबत थोडा वेळ घालवण्यासाठी दारावर टक्-टक् करतात.” अशी गोड आठवण अरिंजय सांगतो.
एआय टूलमध्ये नायराचं भविष्य पाहिलं
“ती अवघ्या चार दिवसांची असताना, त्यांनी तिच्यासाठी ‘किट-कॅट’ चॉकलेटही आणले होते – जणू काही ती ते खाऊ शकत होती! आम्हाला नुकतेच एक एआय टूल सापडले ज्याद्वारे नायरा मोठी झाल्यावर कशी दिसेल हे पाहता आले; आणि ती हुबेहूब माझ्या बहिणीसारखी दिसत होती. आम्ही तिला शुभीचे नाव दिले नाही, कारण आम्हाला तिची स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण व्हावी, असे वाटते.
Kerala Accident : हायवेवर उभ्या लॉरीला धडक, इंजिनिअरिंगच्या आठ विद्यार्थ्यांचा करुण अंत, दरवाजे कापून बॉडी बाहेर काढण्याची वेळपण जेव्हा आम्ही तिच्या चेहऱ्याकडे पाहतो, तेव्हा आम्हाला जाणीव होते की आमची बहीणच आमची काळजी घेत आहे. दहा वर्षांच्या वेदनांनंतर, आमच्या घराला अखेर पुन्हा एकदा ‘घर’ असल्यासारखे वाटू लागले आहे.” असं अरिंजयने सांगितलं आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा