Pune And Pipri Chinchwad Water Cut: गोखलेनगर जलकुंभाला मुख्य जलवाहिनी जोडणीच्या कामामुळे ४ जून रोजी पुण्यातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. ५ आणि ६ जून रोजीही कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुणेकरांनो लक्ष द्या. बातमी तुमच्याशी संबंधित आणि अतिशय महत्त्वाची आहे. ही बातमी आहे पाणीपुरवठ्याबद्दलची. कारण की पाणी पुरवठा बिघडला तर सर्वांनाचा त्याचा फटका बसतो, मुलांच्या शाळा, गृहिणींचे कामं, पुरुषांचे ऑफिसला पोहोचणे यासर्व गोष्टींवरच एकूण परिणाम होत असतो. त्यामुळे आता गोखलेनगर येथील पाण्याच्या टाकीला मुख्य जलवाहिनीची जोडणी करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (४ जून) गोखलेनगर जलकुंभाच्या अखत्यारीतील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (५ जून) उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद
गोखलेनगर, औंध, बोपोडी, पुणे विद्यापीठ परिसर, लॉ कॉलेज रस्ता, बाणेर रस्ता, भोसलेनगर, सेनापती बापट रस्ता, भांडारकर रस्ता, प्रभात रस्ता, पौड रस्ता, शीला विहार, भीमनगर, वेदांतनगरी, कुलश्री कॉलनी, सहवास सोसायटी परिसर, करिष्मा सोसायटी परिसर, डीपी रस्ता, मयूर कॉलनी, कर्वे रस्ता, दशभुजा गणपती ते नळस्टॉप, सहकार वसाहत, भरतनगर, अर्चनानगर, भरतकुंज, स्वप्नमंदिर, युको बँक कॉलनी, मंगेशकर रुग्णालय परिसर, हिमाली सोसायटी, वकिलनगर तसेच नवसह्याद्री आणि वारजेकडे जाणाऱ्या काही भागांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.
चतु:श्रृंगी जलकुंभ क्षेत्रालाही फटका
औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, सिंध सोसायटी आणि औंधगाव परिसरातही पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Fishing Ban Raigad: मान्सूनसाठी समुद्र लॉकडाऊन मोडमध्ये, रायगड किनाऱ्यावर 6 हजार बोटी विसावल्या; मासेमारीला पुढील दोन महिने ब्रेक
पिंपरी-चिंचवडलाही झळ
दुसरीकडे, दुरुस्तीच्या कामामुळे पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर अँड डी, दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि ओएफडीआर परिसरातील पाणीपुरवठाही प्रभावित होणार आहे.
या भागांमध्ये ४ जून रोजी पाणीपुरवठा बंद राहील. तर ५ आणि ६ जून रोजी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.
नागरिकांना आवाहन
महापालिका आणि प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पुढील काही दिवस पाण्याचा वापर जपून आणि काटकसरीने करावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा