विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुती एकत्र निवडणूक लढत असली तरी नांदेडमध्ये महायुतीमध्ये धुसपूस सुरु असल्याचे चित्र आहे. भाजप मित्र पक्षाला सन्मान देत नाही असं वक्तव्य असा शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी केलाय. ही निवडणुक पैश्याची निवडणूक आहे, जे पैसा जास्त वाटतील तो निवडून येणार असं हेमंत पाटील म्हणाले. पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घेणार ते आम्हाला मान्य असेल असं ही हेमंत पाटील म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या आमदाराचा विजय होणार असा विश्वास हेमंत पाटील यांनी व्यक्त केलाय.