म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या तरुणाने जोडीदार तरुणीच्या चारित्र्यावर संशय घेऊन गळा आवळून खून केला. ही घटना वाघोली परिसरात घडली. तरुणीचा मृतदेह घरातच ठेवून बाहेरून कुलूप लावून आरोपी मूळ गावाकडे पसार झाला होता. घरातून दुर्गंध येत असल्याने पोलिसांनी कुलूप तोडले असता, तरुणीचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
रवी सुरेश वैराळ (वय २७, रा. आव्हाळवाडी रस्ता, वाघोली, मूळ रा. वरघडी वैराळ, ता. मेहकर, जि. बुलढाणा) असे अटक आरोपीचे नाव आहे. रिहाना खातून (वय २६, मूळ रा. नोंदईगाजन, मेदिनापूर, पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या बहिणीचे पती इमरान राजेसाहेब बोदलेखान (वय ३१, रा. आदर्शनगर, लोहगाव) यांनी वाघोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २८ ते ३१ मे दरम्यान वाघोलीतील आव्हाळवाडी रस्ता परिसरातील एका इमारतीतील सदनिकेत घडली.
तक्रारदार बांधकाम मजुरी करतात. त्यांची मेहुणी रिहाना आणि आरोपी रवी दोन वर्षांपासून वाघोलीतील केसनंद रस्त्यावरील एका इमारतीत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते. रवी वैराळ हा प्लंबर म्हणून काम करतो. तो आणि रिहाना भाडेतत्त्वावर राहत होते. या दोघांमध्ये २८ मे रोजी कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर ही घटना घडली. पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, आरोपी रवी वैराळला मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने कशाच्या साह्याने तरुणीचा खून केला, त्याला गुन्हा करण्यासाठी आणखी कोणी मदत केली, याबाबत तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी उपनिरीक्षक शिवशंकर राघू आणि सरकारी वकील नीलिमा इथापे यादव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा