• Sun. Jun 7th, 2026

    MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट; ती सही माझी नाहीच, सूचकाच्या दाव्याने काँग्रेसची अडचण, अर्ज बाद होणार!

    MLC Election: विधानपरिषद निवडणुकीत धक्कादायक ट्विस्ट; ती सही माझी नाहीच, सूचकाच्या दाव्याने काँग्रेसची अडचण, अर्ज बाद होणार!

    सोलापूर: स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना काँग्रेसची मोठी अडचण झाली आहे. कारण काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या उमेदवारी अर्जावर सूचकाने सही केली होती. मात्र ऐनवेळी सूचकाने ही सही माझी नाही, अशा प्रकारचा लेखी अर्ज दिल्याने, काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद होण्याच्या मार्गावर आहे. सकाळपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांकडून हरकत घेण्याचे प्रकार सुरू होते. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजप आमदार देवेंद्र कोठे हे जिल्हाधिकारी कार्यालयात होते.

    काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या सूचकाने 20 ते 25 लोकांसोबत येऊन जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांना बाँडवर लेखी लिहून देत स्पष्ट केले, ही सही माझी नाही. सूचकाने थेट माघारी घेतल्याने उमेदवाराचा अर्ज आपोआप बाद होतो. सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यादेखील ताबडतोब जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या आणि त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. लोकशाहीला ठार करण्याचा हा प्रयत्न असल्याची संतप्त प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली.

    काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी
    काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या सूचकाने माघारी घेतल्याने भाजप उमेदवारासमोरील तगडे आवाहन संपुष्टात आलं आहे. भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत , भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि देवेंद्र कोठे हे बाहेर येताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी देखील कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसला प्रत्युत्तर देत घोषणाबाजी केली.

    सूचकाने नेमकं काय म्हटलं?

    काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांनी व खासदार प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, सूचक असलेल्या नागेश भोसले यांना भाजप नेत्यांनी आमिष दाखवून आणि त्याचं अपहरण करून माघार घ्यायला लावली आहे.

    दरम्यान, सूचक नागेश भोसले यांनी आपली बाजू मांडली आहे. “मुळात मी काँग्रेसचा लोकप्रतिनिधी नाही. मी तीर्थ क्षेत्र विकास आघाडीकडून पंढरपूर नगरपरिषदेत निवडून आलो आहे. मी कसल्याही अमिषाला बळी पडणारा नसून किंवा पैसे घेणारा नाही, उलट मी पैसे पुरवत असतो,” अशी प्रतिक्रिया नागेश भोसले यांनी दिली आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed