महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी कलाटणी येताना दिसत आहे. कारण खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांना उद्देशून संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “पश्चात्ताप झाला असेल तर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी भेटीसाठी या”, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील धुसफूस समोर आली आहे. महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषदेच्या जागेवरुन तर राजकारण चांगलंच तापलं आहे. महायुतीत ही जागा अखेर भाजपला सुटली. भाजपकडून सुहास शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी इथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.
“भाजप हे स्लो पॉईजन आहे. हळूहळू शिवसेनेला संपवत आहे”, असं अब्दुल सत्तार म्हणाले. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सत्तारांच्या टीकेवरुन सत्तारांनी संबंधित वक्तव्य करण्यापूर्वी आपल्या नेत्यांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच अब्दुल सत्तार यांना तातडीने वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीचे समन्स बजावण्यात आले आहे. अब्दुल सत्तार यांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांची आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे.
अंबादास दानवे आणि सत्तार यांची गळाभेट
दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांचीदेखील भेट झाली आहे. दोन्ही नेत्यांची गळाभेट झाल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंबादास दानवे यांनी काल दोन्ही शिवसेनेच्या एकत्र येण्याबाबत एक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं असतानाच सत्तार आणि अंबादास दानवे यांनी गळाभेट घेतल्याचं समोर आलं आहे. तसेच आज खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय राऊत यांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन कलाटणी मिळाली आहे. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडीा घडतात? याबाबत उत्सुकता वाढली आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“शिवसेना एकच आहे. मी कालही म्हणालो. दोन शिवसेना असूच शकत नाही. जिथे ठाकरे तिथे शिवसेना. शिवसेनेचं काम हे नेहमी शिवसेना भवन किंवा ‘मातोश्री’ येथून चालतं. ठाकरे नाहीत तर ती शिवसेना कशी असणार?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
“ज्यांना पश्चात्ताप झाला असेल, ज्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला असेल, ज्यांना अशी खात्री पटली असेल की, भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे. हा शेतकरी आणि मराठी माणसांच्या विरोधी पक्ष आहे. हा शेठजी आणि व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, अशी ज्यांना जाणीव झाली असेल, तर त्यांनी मातोश्रीवर यावं आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटावं”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
अंबादास दानवे काय म्हणाले?
“शिवसेना दोन नाहीत तर शिवसेना एकच आहे, जी बाळासाहेबांची उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करते. ही तर बाकी गद्दार लोकांची गँग आहे. त्यामुळे गँगमधील कोण आलं, अशाप्रकारची भूमिका मांडायची असेल तर आम्ही निश्चित त्याचं स्वागत करु. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललं पाहिजे, असं आवाहन अंबादास दानवे यांनी केलं आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांच्या आवाहनाला कुणी प्रतिसाद देतं का? ते पाहणं महत्त्वाचं आहे”, असं अबादास दानवे म्हणाले आहेत.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा