• Mon. Jun 15th, 2026

    Thane News: ठाण्यातून गायब झालेली मुलगी अखेर सापडली, पोलिसांनी तब्बल ९४८ सीसीटीव्ही तपासले, लोकलमुळे कोडं उलगडलं!

    Thane News: ठाण्यातून गायब झालेली मुलगी अखेर सापडली, पोलिसांनी तब्बल ९४८ सीसीटीव्ही तपासले, लोकलमुळे कोडं उलगडलं!

    Crime News: या मुलीला कुटुंबीयांच्या स्वाधीन करताच उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.

    ठाण्यातून गायब झालेली मुलगी अखेर सापडली, पोलिसांनी तब्बल ९४८ सीसीटीव्ही तपासले, लोकलमुळे कोडं उलगडलं!(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: दिव्यातून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा ठाणे पोलिसांनी तब्बल ९४८ सीसीटीव्ही फुटेजचा शोध घेत सुखरूप सुटका केली. तब्बल ६०हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचारी, पोलिस मित्र आणि दिवा शहरातील नागरिकांच्या मदतीने ही शोधमोहीम राबवण्यात आली.

    दिव्यात कुटुंबियांसह राहणाऱ्या मुलीचे वडील पाच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधून याठिकाणी आले होते. ते भिवंडीत रांगोळीच्या कारखान्यात काम करतात. मुलगी २८ मे रोजी रात्री ८.३० वाजता खाऊ आणण्यासाठी घराबाहेर पडली. त्यानंतर परतली नाही. तिचा शोध न लागल्याने वडिलांनी मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सहायक पोलिस आयुक्त प्रिया डमाळे आणि मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी तपासाला गती दिली. दिव्यातील विविध इमारती, आजूबाजूचा परिसर पोलिसांच्या पथकाने पिंजून काढला. त्यावेळी एका इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी दिवा आगासन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जाताना दिसली. त्यानंतर ती दिवा स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून २८ मे रोजी रात्री १०.५७ वाजताच्या अंबरनाथ लोकलमध्ये प्रवेश करताना दिसली. पोलिसांच्या पथकाने कोपर, डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ या रेल्वे स्थानकांत त्यांची पथके पाचारण केली. त्यानंतर एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री १२ वाजता मुलगी एका अनोळखी व्यक्तीसोबत अंबरनाथ स्थानकात उतरताना दिसली. त्यानंतर दोघे बदलापूर लोकलमध्ये चढले आणि मध्यरात्री बदलापूर स्थानकात उतरताना दिसले होते. त्यानंतर पोलिसांनी तिचा माग काढला.

    माणुसकीच्या नात्याने सांभाळ केल्याचा दावा
    बदलापुरात शोधमोहीम राबवत अनोळखी व्यक्तीची ओळख पोलिसांना पटली. पथकाने त्या व्यक्तीचे घर गाठले. त्यावेळी त्याच्याकडे बेपत्ता मुलीसह तीन ते नऊ वयोगटातील चार अल्पवयीन मुले आढळून आली. घरातील इतर तीन मुले त्याची असल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याने माणुसकीच्या नात्याने मुलीचा सांभाळ केला असून मुलगी कोणत्याही गैरकृत्याला बळी पडू नये म्हणून त्याने तिला घरी आणल्याचे स्पष्ट केले. हा व्यक्ती नवी मुंबई येथील एका कंपनीत काम करतो. दुर्दैवाची बाब म्हणजे, त्याच्या एका मुलीवर अत्याचार झाले होते.आपल्या मुलीप्रमाणे या बेपत्ता मुलीसोबत असा प्रकार घडू नये म्हणून त्याने तिला घरी आणले आणि तिचे संगोपन केल्याची माहिती परिमंडळ १चे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा