• Sat. Jun 6th, 2026
    Solapur Crime: ‘ती’ बँक मॅनेजर, ‘तो’ही अधिकारी; पण प्रेमविवाहाच्या अशा भयंकर शेवटाचा कोणीच विचार केला नव्हता, पोलिसही हादरले

    Solapur Crime News: सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत प्रेमविवाह केलेल्या पत्नीची भररस्त्यात चाकूने ५० वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. चारित्र्याच्या संशयातून पतीने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनेनंतर आरोपी स्वतः पोलिसांत हजर झाला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    इरफान शेख, सोलापूर: बार्शी शहराजवळील बार्शी-परंडा मार्गावर सोमवारी सकाळी घडलेल्या थरारक घटनेने बार्शी हादरली आहे. ऋषिकेश पाटील याने आपल्य पत्नी धनश्री पाटील हिची भररस्त्यात चाकूने निर्घृण हत्या केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर पती ऋषिकेश पाटील स्वतःहून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. चारित्र्याचा संशयावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबत दिवसभर गुन्हा नोंदची प्रक्रिया सुरू होती. भर रस्त्यात, पत्नीची अशी निर्घुण हत्या केल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे. भर रस्त्यात पन्नास वार केले, त्यानंतर रस्त्यावरच गळा चिरला. ऋषिकेश पाटील याने पत्नी सोबत अनेक महिने संसार केला, मात्र गळा चिरताना थोडीही दया केली नाही. बार्शी परंडा मार्गावर या जा करणाऱ्या लोकांनी लांबून सोडविण्याचा प्रयत्न केला, डोक्यात सैतान घुसलेल्या पतीने पत्नीचा जीव जाईपर्यंत वार करत राहिला आणि गळा चिरला. दोघेही पती-पत्नी उच्च शिक्षित आहेत. दोघेही वित्त क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. प्राथमिक माहितीनुसार धनश्री या बँक मॅनेजर पदावर कार्यारत होत्या.

    प्रेम विवाह झालेल्या पती पत्नीत वाद विकोपाला

    पती ऋषिकेश पाटील आणि पत्नी धनश्री पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून मध्ये वाद झाला होता. वाद होताना अनेकदा ऋषिकेश पाटील याने धनश्रीला मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. परंतु मागील दोन दिवसांपासून वाद चिघळले होते. सोमवारी धनश्री पाटील या नेहमीप्रमाणे बँकेकडे निघाल्या होत्या. पण वाटेत मृत्यू पतीच्या वेशभूषेत वाट पाहत होता. बार्शी परांडा मार्गावर संतापाच्या भरात ऋषिकेशने पत्नी धनश्रीवर चाकूने सुमारे 50 वार केले. धनश्री रक्ताच्या थारोळ्यात पडली , शेवटी ऋषीकेश ने गळा चिरला.

    थरारक दृश्य पाहून लोकांनी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र

    बार्शी-परंडा रोडवर ऋषिकेश ज्यावेळी धनश्रीवर वार करत होता. त्यावेळी थरारक दृश्य पाहून काही लोकांनी पळ काढला तर रस्त्यावरील काही नागरिकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. डोक्यात सैतान घुसलेल्या राक्षस पतीनं मात्र नागरिकांना धमकावत मागे हटवले. धनश्रीने जाग्यावरच जीव सोडला. दोघांनी काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केला होता. प्रेम विवाहाचा असा दुर्दैव अंत झाल्याने बार्शी सह सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा