Pratap Sarnaik:सध्या रिक्षाचालकांचा मुद्दा राज्यात चांगलाच चर्चेत आहे. मराठी अनिवार्य सोबतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्क्रॅप रिक्षांवर कारवाई करा असा नवा निर्देश दिला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर धावणाऱ्या स्क्रॅप रिक्षा प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका आहेत. अशा रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होताना त्या कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर दिसता कामा नयेत. स्क्रॅप रिक्षांविरोधात ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार वाहन परिवहन विभागाला दिले.
प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता
स्क्रॅप झालेल्या किंवा नियमबाह्य रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर होत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन परिवहनमंत्री सरनाईक यांनी शुक्रवारी विशेष बैठक घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. नियमबाह्य आणि धोकादायक वाहनांमधून प्रवासी वाहतूक करण्यास कोणतीही मुभा दिली जाणार नाही,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
पाच ऑक्टोबरपर्यंत स्क्रॅप रिक्षांविरोधातील कारवाईचा आढावा
स्क्रॅप घोषित झालेल्या रिक्षांचा पुन्हा वापर, बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंदणी किंवा नियमांचे उल्लंघन करून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची विशेष तपासणी करण्यात यावी. संबंधित वाहनांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासोबतच आवश्यक ती कठोर पावले उचलावीत, असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष तपासणी मोहीम प्रभावीपणे राबवावी. पाच ऑक्टोबरपर्यंत स्क्रॅप रिक्षांविरोधातील कारवाईचा आढावा सादर करावा, असेही त्यांनी सांगितले.
Toll Waiver: टोलमाफीच्या घोषणेला होतोय उशीर ; गावी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय, पासवाटप किमान आठ दिवस आधी सुरू करण्याची मागणी
परिवहन आयुक्त कार्यालयात झाली बैठक
रिक्षा-टॅक्सी चालक आणि संघटनांनीही प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन नियमांचे पालन करावे. नियमबाह्य वाहनांमुळे संपूर्ण रिक्षा व्यवसायाची प्रतिमा खराब होऊ नये, यासाठी अधिकृत आणि सुरक्षित वाहनांनाच प्रवासी वाहतुकीची परवानगी असावी, अशी भूमिका या वेळी मांडण्यात आली. परिवहन आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर,रिक्षा-टॅक्सीयुनियनचे नेते शशांक राव उपस्थित होते.
लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.
कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.
२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.… आणखी वाचा