• Sat. Sep 5th, 2026

Pune Metro: सध्या दोन्ही मार्गिकांवर मिळून दररोज ५५४ फेऱ्यांद्वारे प्रवाशांना सेवा दिली जाते. वारंवारता पाच मिनिटांवर आणल्यानंतर फेऱ्यांची संख्या वाढणार असून, त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
श्रीकृष्ण कोल्हे, पुणे : मेट्रोला मिळणारा वाढता प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता आणखी वाढविण्याचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून चाचण्या घेण्यात येत आहेत. सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावत आहे.

पुण्यात वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड-स्वारगेट या दोन मार्गिकांवर मेट्रो सेवा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोची दैनंदिन प्रवासीसंख्या अडीच लाखांच्या जवळ पोहोचली आहे. सध्या गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटाला मेट्रो सेवा सुरू आहे. पण, प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता मेट्रो सेवेचा कालावधी आणखी कमी करण्याचे नियोजन महामेट्रोकडून सुरू आहे. त्यानुसार महामेट्रोने गणेशोत्सापासून गर्दीच्या वेळेस दर पाच मिनिटाला सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तर विना गर्दीच्या वेळी दर १० मिनिटाला मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू असणार आहे.

Maharashtra TimesPune Vidyanand Bapat: मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, लोकांनी डीजेवर नाचवलं, मीम्सचाही धुमाकूळ; विद्यानंद बापट खास शैलीत बोलले, नेमकं काय म्हणाले?सर्व ३३ रेक सेवेत

महामेट्रोकडे तीन डब्यांचे एकूण ३३ रेक आहेत. त्यापैकी सध्या ३० रेकचा नियमित वापर केला जात आहे. गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो चालविण्यासाठी सर्व ३३ रेक सेवेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये वनाझ-रामवाडी मार्गावर १७, तर पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावर १६ रेकचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत फेऱ्यांची संख्या वाढविता येणार आहे.पाच मिनिटांच्या वारंवारितेने मेट्रो चालविण्याच्या चाचण्या गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहेत. या चाचण्या यशस्वी होत असून, गणेशोत्सवापासून प्रत्यक्ष सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महामेट्रोची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्दे
महामेट्रोकडे एकूण रेक—- ३३
सध्या मार्गावर धावणारे रेक—- ३०
वनाझ-रामवाडी मार्गावरील रेक—- १७
पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गावरील रेक—- १६
दैनंदिन सरासरी प्रवासीसंख्या—- सुमारे २.४० लाख
सध्याची गर्दीच्या वेळेतील वारंवारता—- ६ मिनिटे
गणेशोत्सवापासून प्रस्तावित वारंवारता—- ५ मिनिटे
विना गर्दीच्या वेळेतील वारंवारता—- १० मिनिटे

Maharashtra TimesBaramati Crime : निर्जन शेतात अडीच कोटींचा गांजा, बारामतीमधील प्रकरणाचे ओडिशापर्यंत धागेदोरे; कुख्यात विकी कांबळे पोलिसांच्या जाळ्यातमेट्रोला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवासीसंख्या अडीच लाखांवर पोहोचली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.– श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा